उद्या विशेष समारंभास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Maharashtra Udyog) : गत दोन वर्षात महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून परकीय गुंतवणुकीत (Maharashtra Udyog) महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले. महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयाची माहिती उद्योग जगत साकारणार्या उद्योजकांना, व्यवसायिकांना व्हावी, राज्याचे व्हिजन कळावे या उद्देशाने शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी हॉटेल सेंटर पॉईंट येथे सकाळी १०.३० वाजता ‘उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी’ (Maharashtra Udyog ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र भारतात पहिल्या स्थानावर
या (Maharashtra Udyog) विशेष समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खा. श्यामकुमार बर्वे, आ. प्रवीण दटके, आ. अभिजित वंजारी, आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर अडबाले, आ. कृपाल तुमाने, आ. अनिल देशमुख, आ. डॉ नितीन राऊत, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. समीर मेघे, आ. आशीष जयस्वाल, आ. टेकचंद सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित राहणार आहेत.