बुलडाणा (Maharashtra University) : पत्रकारितेतील चांगल्या-वाईट वृत्ती-प्रवृत्तीवर तथा आधुनिक पत्रकारितेच्या बाह्यरंग व अंतरंगावर प्रकाश टाकणारे व पत्रकारिता जगताच गाजलेले “पत्रकारितेतील वास्तव” हे ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे (Rajesh Rajore) यांचे पुस्तक कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (Maharashtra University) जळगावच्या जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागले असून तशा मान्यतेचे पत्र, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक सुधीर भटकर यांनी पाठविले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता तदर्थ अभ्यास मंडळाची सभा 9 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आली होती, या सभेत जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी तथा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून “दिलीराज प्रकाशन प्रा. लि. पुणे” यांनी प्रकाशित केलेले ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे (Rajesh Rajore) यांचे “पत्रकारितेतील वास्तव” हे पुस्तक लावण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आल्याचे संचालक सुधीर भटकर यांनी कळविले आहे.
“दैनिक देशोन्नती”च्या रविवारीय पुरवणीत गत काही वर्षांपूर्वी राजेश राजोरे यांनी “पत्रकारितेतील वास्तव” हा स्तंभ 52 भागांमध्ये चालविला होता, त्यावेळी हा स्तंभ पत्रकारिता जगतात खळबळ उडवून गेला होता. याच भागांचे संकलन करून “पत्रकारितेतील वास्तव” हे पुस्तक पुढे आले. या पुस्तकालाही साहित्यातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले. आता हेच पुस्तक (Maharashtra University) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागल्यामुळे, राजेश राजोरे (Rajesh Rajore) यांचे सर्वत्र कौतुक होत आहे !