मुंबई/नवी दिल्ली (Maharashtra Weather Alert) : महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुन्हा रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. येत्या एक-दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. 30 जुलैपासून बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा (Heavy rain) जोर वाढणार आहे. IMD ने पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट (Weather Alert) जारी केला आहे. तर गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
येथे CLICK करा: मुसळधार पावसाने 66 वर्षे जुना विक्रम मोडला
‘या’ राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस
हवामान विभागानुसार, 19 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे. 29 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी विदर्भ आणि मध्य प्रदेशात तुरळक ठिकाणी, 30 जुलै ते 31 जुलैपर्यंत गुजरात प्रदेश आणि 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात पाऊस पडेल. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस (Weather Alert) पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थानमध्ये 29 जुलैपासून तर पश्चिम उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात 31 जुलै आणि 1 ऑगस्टला पाऊस पडणार आहे.
उत्तर-पश्चिम भारतात मुसळधार पावसाचा अलर्ट
हवामान विभागानुसार, 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 29 जुलै ते 30 जुलै आणि 1 ऑगस्ट या कालावधीत हवामान बदल होणार आहे. दरम्यान, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, गिलगिट, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 29 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व राजस्थान आणि पूर्व उत्तर प्रदेशात 30 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 29 जुलैपर्यंत आणि पश्चिम उत्तर प्रदेशात 30 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता (Weather Alert) हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतात मान्सून अलर्ट
IMD नुसार, 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि मणिपूरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. 31 जुलै रोजी झारखंडमध्ये काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. केरळ, माहे यांसारख्या भारतातील दक्षिण भागात 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy rain) पडेल. दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 28 जुलै आणि किनारी कर्नाटकात 29 जुलैला पाऊस पडेल. 29 जुलै रोजी त्रिपुरा, नागालँड आणि मणिपूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, 29 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत मेघालय आणि आसाममध्ये काही ठिकाणी (Weather Alert) मुसळधार पाऊस पडेल. तसेच सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये 30 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत पाऊस पडेल. ओडिशामध्ये 29 जुलै ते 1 ऑगस्ट आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर 29 जुलै आणि 1 ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.