मुंबई (Maharashtra Weather Today) : संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळे भारतातील बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather) मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या किनारपट्टी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रविवार, 14 जुलै रोजी या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
आज रविवारी सकाळपासून (Maharashtra Weather) महाराष्ट्रातील पुणे शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडत आहे. त्याचवेळी मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. पाणी साचल्याने अंधेरी सबवेला सर्वाधिक फटका बसला. तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. येथे CLICK करा : 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा; जोरदार वादळासह मुसळधार पावसाचा अलर्ट जारी
#WATCH | Maharashtra: Heavy rain lashes parts of Pune city. pic.twitter.com/cnJys5Lfvr
— ANI (@ANI) July 14, 2024
या जिल्ह्यांसाठीही हवामान अलर्ट जारी
रविवारी हवामान विभागाने मुंबईला लागून असलेल्या ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय (Maharashtra Weather) ठाणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. IMD नुसार, घाट परिसरात काही ठिकाणी (Heavy rainfall) मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा आणि कोल्हापूर येथे मैदानी भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे हवामान
हवामान विभागाने आज रविवारी सकाळी सांगितले की, येत्या तीन ते चार तासांत रायगड आणि ठाण्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rainfall) पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढेच नाही तर 16 जुलैपर्यंत (Maharashtra Weather) मध्य महाराष्ट्रातील घाट भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये ५ दिवस अतिवृष्टीचा इशारा
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवार, 14 जुलैपासून पुढील पाच दिवस पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार (Heavy rainfall) ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याआधी मुंबईतील नागरिकांना गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याची विनंती केली होती.