पूरग्रस्त शेतकरी आर्थिक मदत

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

Flood-Affected Farmers Financial Aid: राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

(Flood-Affected Farmers Financial Aid)

 

जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई

मुंबई (Flood-Affected Farmers Financial Aid) : राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी 262 कोटी 69 लाख 95 हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीपोटी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांचा समावेश आहे. या (Flood-Affected Farmers Financial Aid) निर्णयामुळे राज्यातील सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

27 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लाभ

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 3 लाख 9 हजार 289 बाधित शेतकऱ्यांच्या सुमारे 2 लाख 68 हजार 918 हेक्टर क्षेत्रासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील 27 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

शेतजमिनीच्या नुकसानीसाठीही मदत

अतिवृष्टी आणि पुरामुळे केवळ शेतीपिकांचेच नव्हे, तर शेतजमिनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा (Flood-Affected Farmers Financial Aid) बाधित शेतकऱ्यांसाठीही शासनाने स्वतंत्र निधी मंजूर केला आहे. राज्यातील 34 हजार 984 शेतकऱ्यांच्या 7 हजार 675.40 हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीपोटी 29 कोटी 21 लाख 9 हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.

विदर्भासह विविध विभागांचा समावेश

अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मंजूर केलेल्या मदतीत समावेश आहे. (Flood-Affected Farmers Financial Aid) अतिवृष्टी आणि पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार मदत वितरित केली जाणार आहे.

संबंधित सामग्री

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

Maharashtra Student Suicides: देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आल

Nov 12, 2026
दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

दुपारी उन्हाचा चटका, तर रात्री गारठा! राज्यात पुढील चार दिवसांत थंडीचा जोर वाढणार

Maharashtra Climate Change: दिवाळीनंतर महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. राज्यातील बहुतांश भागांतून पावसाने माघार घेतली असून, आगामी काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Nov 12, 2026
नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरात शिक्षक दाम्पत्याची आत्महत्या; दिवाळीसाठी आलेल्या पती-पत्नीचा घरात आढळला मृतदेह

नागपुरातील रेवतीनगर येथे शिक्षक दाम्पत्य मनीष आणि सोनाली गणवीर यांचे मृतदेह आढळले. बेलतरोडी पोलिसांकडून तपास सुरू.

Nov 10, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026