मणिपुर हिंसाचार प्रकरण

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार; नागरिकांवर सशस्त्र हल्ला, गोळीबारात चौघांचा मृत्यू

Manipur Violence Case: मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे. इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमावर्ती जंगल परिसरात सरपण गोळा करणाऱ्यांवर गोळीबार...

मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार; नागरिकांवर सशस्त्र हल्ला, गोळीबारात चौघांचा मृत्यू

Manipur Violence Case

 

मुख्यमंत्री निवासाबाहेर मृतदेह ठेवून संतप्त नागरिकांचा निषेध

इम्फाळ (Manipur Violence Case) : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमधील तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमावर्ती जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांवर सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेत एकूण चार नागरिकांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. तसेच आणखी तिघे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये अरुबाम रोनिल (35), लैरेंलाकपम इनाओबी (51) आणि क्षेत्त्रीमायुम सुशील (32) यांचा समावेश आहे. रोनिल आणि इनाओबी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सुशील यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारांसाठी इम्फाळमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या (Manipur Violence Case) हल्ल्यामागे कुकी अतिरेक्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी हल्लेखोरांची ओळख आणि घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेच्या तपासाकडे आणि सुरक्षा यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री निवासाबाहेर संतप्त नागरिकांचा ठिय्या

गोळीबाराच्या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त आंदोलकांनी मृतदेह मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर नेऊन निषेध व्यक्त केला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याची माहिती आहे. या (Manipur Violence Case) आंदोलनामुळे परिसरातील तणाव आणखी वाढला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मे 2023 पासून संघर्षाची धग कायम

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये जातीय संघर्षाच्या घटना घडत आहेत. या (Manipur Violence Case) हिंसाचारात अनेकांना जीव गमवावा लागला असून, घरे आणि मालमत्तांचे नुकसान झाले आहे. मोठ्या संख्येने नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात यापूर्वीही हिंसक घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत ताज्या गोळीबारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. या (Manipur Violence Case) घटनेमुळे दोन्ही समुदायांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात असून, संवेदनशील भागांतील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

संबंधित सामग्री

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद संतापल्या; 'आधी चित्रपट पाहा, मग विरोध करा!'

रुपाली चाकणकरांच्या ट्रेडमार्कवर दिपाली सय्यद यांचा सवाल! 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट आणि सेन्सॉर बोर्डावरून नवा वाद.

Nov 17, 2026
धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

धरणांची पाणीपातळी घसरली; राज्यात केवळ 64 टक्के पाणी शिल्लक!

Maharashtra Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली असून, राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 64.17 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा 90.54 टक्के

Nov 16, 2026
बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

बंगालच्या उपसागरात सलग तिसऱ्या चक्रीवादळाचे संकट; ‘अक्वान’ वादळाची शक्यता

Bengal Cyclone Crisis: बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाल

Nov 16, 2026
महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील नामांकित ३ हॉटेलवर FDA चा बडगा! अन्न विक्रीचे परवाने निलंबित; पर्यटकांची तारांबळ

महाबळेश्वरमधील ३ नामांकित हॉटेल्सचे FDA कडून अन्न विक्री परवाने निलंबित. तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईचा धडाका सुरूच!

Nov 16, 2026
दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

दिव्या देशमुख, तेजस्विन शंकर यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव!

National Sports Awards: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत डेकॅथलॉन प्रकारात कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.

Nov 13, 2026