आमदार श्वेता महाले

आमदार श्वेता महाले यांच्या समर्थ पाठपुराव्याला यश; पेनटाकळीच्या पाणीप्रश्नावरील उपोषणाची सांगता!

MLA Shwetatai Mahale: पेनटाकळी धरणातील पाणीवाटपाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाची अखेर आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या प्रभावी...

आमदार श्वेता महाले यांच्या समर्थ पाठपुराव्याला यश; पेनटाकळीच्या पाणीप्रश्नावरील उपोषणाची सांगता!

MLA Shwetatai Mahale Patil

 

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी पाणी नियोजनावर एकमत;
पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर उद्या अंतिम निर्णय होणार..

चिखली (MLA Shwetatai Mahale) : पेनटाकळी धरणातील पाणीवाटपाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाची अखेर आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकाराने आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे 4 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री सांगता झाली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे आणि दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांच्या गरजांचा समतोल राखला जावा, यासाठी आमदार श्वेता महाले (MLA Shwetatai Mahale) यांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून या प्रश्नात लक्ष घातले. शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांच्या मागण्यांची तीव्रता लक्षात घेऊन त्यांनी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे हा प्रश्न अतिशय तळमळीने मांडला.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नामदार प्रतापराव जाधव, आमदार श्वेता महाले, मेहकरचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शेतकरी तसेच शेतकरी प्रतिनिधी विनायक  सरनाईक हेदेखील उपस्थित होते. बैठकीत पेनटाकळी धरणाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पाणीविषयक गरजा, पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आणि उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर विचार करण्यात आला.

धरणातील उपलब्ध पाणीसाठा, त्याचे बाष्पीभवन, पाण्याचा अपेक्षित वापर, सिंचनासाठी आवश्यक असलेली पाण्याची मात्रा, पिण्याच्या पाण्याची गरज, पाण्याचे वहन करताना होणारी संभाव्य घट तसेच धरणाची सद्यस्थिती आणि पाण्याचे नियोजन यांसारख्या महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबींचा विचार करून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने पाणीवाटपाचे नियोजन करण्याबाबत बैठकीत एकमत झाले.

विशेषतः पेनटाकळी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या आणि उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, पिके पाण्याअभावी जळू नयेत किंवा  नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक ते पाणी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिले. मात्र, पाण्याच्या अंतिम नियोजनाबाबत पालकमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर उद्या अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बैठकीनंतर आमदार श्वेता महाले (MLA Shwetatai Mahale) यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये आणि त्यांच्या पाणीप्रश्नावर न्याय्य तोडगा निघावा, यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या प्रश्नावर कोणताही घाईघाईचा किंवा अंतिम निर्णय जाहीर न करता, प्रशासनाकडून योग्य तो निर्णय होण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

शेतकऱ्यांच्या हिताचा हा प्रश्न केवळ पाणीवाटपापुरता मर्यादित नसून त्यांच्या वर्षभराच्या कष्टांचा आणि उपजीविकेचा प्रश्न आहे, ही भावना आमदार श्वेता महाले यांनी प्रशासनासमोर ठामपणे मांडली. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या तळमळीच्या आणि भावनिक संवादामुळे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास सहमती दर्शवली.

अखेर आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता केली. उद्या पालकमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याने आता या निर्णयाकडे पेनटाकळी परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना न्याय्य पाणीवाटप हाच या प्रश्नाच्या तोडग्याचा केंद्रबिंदू राहणार आहे.

टैग्स: MLA Shwetatai Mahale

संबंधित सामग्री

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

MLA Shwetatai Mahale Patil: नटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या समान व न्याय्य वाटपाच्या मागणीसाठी मौजे पेनसावंगी येथे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू ..

Nov 04, 2026
खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

MLA Shwetatai Mahale Patil: पुरा पाऊस, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू

Nov 03, 2026
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रहिवासी तालुक्यातील बँकांमधूनच पीक कर्ज द्या: आ. श्वेताताई महाले

MLA Shwetatai Mahale: तालुक्यातील बँकांमार्फतच त्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली....

Oct 06, 2026
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil: गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील

Sep 11, 2026