नेहा बोरा

‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चात नेहा बोरांचीच चर्चा; वेधले सर्वांचे लक्ष

Neha Bora: राजधानी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात नेहा बोरा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असतानाही माध्यमांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष...

‘इंडिया’ आघाडीच्या मोर्चात नेहा बोरांचीच चर्चा; वेधले सर्वांचे लक्ष

Neha Bora

जंतर-मंतर 2.0 आंदोलनातही सक्रिय भूमिका

नवी दिल्ली (Neha Bora) : राजधानी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या (India Alliance) वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात नेहा बोरा (Neha Bora) चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असतानाही माध्यमांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. राहुल गांधी यांच्यासह त्या खुल्या टेम्पोतून मोर्चात सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिल्या. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, तर काहींनी त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या.

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या ‘जंतर-मंतर 2.0 आंदोलनातही नेहा बोरा (Neha Bora) सक्रिय दिसल्या. पोलिसांची कारवाई टाळत आंदोलन पुढे नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची चर्चा झाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागले.

दरम्यान, या (India Alliance) आंदोलनात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (CJP) नेते सहभागी झाले नाहीत. आंदोलनाची पुढील दिशा नंतर निश्चित केली जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आंदोलनाच्या नेतृत्वात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे चित्र दिसले. दुसरीकडे, ‘इंडिया’ आघाडीचा (India Alliance) भाग नसलेल्या आम आदमी पक्षानेही सोमवारच्या मोर्चापासून दूर राहणे पसंत केले.

दोन ते अडीच तास मोर्चाची वाटचाल; पोलिसांनी घातला अडथळा

बाराखंबा-कॅनॉट प्लेस परिसरातून सुरू झालेला मोर्चा सुमारे दोन ते अडीच तास सुरू होता. जवळपास दोन किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भगवानदास रोडवरील राष्ट्रीय नाट्य अकादमीजवळ पोलिसांनी मोर्चाला रोखले. सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरापासून काही अंतरावरच पुढील मार्ग बंद करण्यात आला.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांसह शीघ्र कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्त्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले. तसेच, जमावबंदी लागू असल्याच्या सूचना पोलिसांकडून वारंवार दिल्या जात होत्या.

नेहा बोरांचा (Neha Bora) सहभाग, विविध संघटनांची भूमिका आणि पोलिसांनी मोर्चाला घातलेला अडथळा यांमुळे दिल्लीतील या (India Alliance) आंदोलनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.

संबंधित सामग्री

अभिजीत दीपके यांच्या सीजेपीला धक्का? आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा; नेहा बोरा चे विधान

अभिजीत दीपके यांच्या सीजेपीला धक्का? आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा; नेहा बोरा चे विधान

नेहा बोरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात पोलिसांच्या नोटिशीला आव्हान दिले. सेंट्रल पार्क आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला.

Oct 22, 2026
दिल्लीतील ‘तिरंगा मार्च’ प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके यांना जामीन

दिल्लीतील ‘तिरंगा मार्च’ प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके यांना जामीन

दिल्लीतील तिरंगा मार्च प्रकरणात CJP प्रमुख अभिजित दीपके आणि नेहा बोरा यांना जामीन. सौरभ दास आणि आशुतोष रांका अद्याप न्यायालयीन कोठडीत.

Oct 17, 2026
CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांकडून अटक; नेहा बोरा यांची सुटका, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्ली पोलिसांकडून अटक; नेहा बोरा यांची सुटका, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

दिल्लीतील तिरंगा मार्चपूर्वी CJP संस्थापक अभिजीत दीपके यांना अटक, तर नेहा बोरा यांची सुटका. पोलिसांच्या कारवाईवर बोरांनी प्रश्न उपस्थित केले.

Oct 17, 2026
‘पत्रकार परिषद बंद करा’च्या घोषणा; कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

‘पत्रकार परिषद बंद करा’च्या घोषणा; कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?

दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा घोषणाबाजी करणाऱ्यांवर हल्लाबोल; सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेविरोधात शुक्रवारी आंदोलन.

Oct 15, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026