परभणीनितील धारासूर येथे भरला महाकुंभ अमृत स्नान सोहळा
परभणी/गंगाखेड (Mahashivratri) : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन कालीन ग्रामदैवत (Shri Gupteshwar Mandir) श्री गुप्तेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त समिती व ग्रामस्थ्यांनी (Mahashivratri) महाशिवरात्री, श्री गुप्तेश्वर मंदिर व दक्षिण वाहिनी गोदावरी नदी यांचा त्रिवेणी संगम घडवत धारासूर येथील गोदावरी नदी काठावर महाकुंभ अमृत स्नान सोहळ्याचे आयोजन केल्याने कुंभमेळा समाप्ती पर्वावर बुधवार २६ फेब्रुवारी रोजी पहाटे पासून धारासूर गोदावरी नदी काठावर अमृत स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली होती.
कुंभमेळा समाप्ती पर्व व महाशिवरात्रीच्या पर्वावर (Mahashivratri) तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन कालीन श्री गुप्तेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त समिती व ग्रामस्थ्यांच्या वतीने बुधवार रोजीच्या पहाटे महाकुंभ अमृत स्नान महोत्सवाला सुरुवात केली. या पर्वावर मंगळवार रोजीच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी धारासूर येथे अलोट गर्दी केली होती. दिवसभर लाखो भाविकांनी (Shri Gupteshwar Mandir) श्री गुप्तेश्वरांचे दर्शन घेत गोदावरी नदीत अमृत स्नान केले.
धारासूर वासीयांच्या वतीने श्री गुप्तेश्वर पिंडीसह याप्रसंगी उपस्थित महामंडलेश्वर मनिषानंद महाराज, रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे, हभप अच्युत महाराज दस्तापूरकर, गजानन महाराज गोंदीकर आदींची गावातील ग्राम पंचायत कार्यालयापासून मुख्य रस्त्याने गोदावरी नदी काठापर्यंत वाजत गाजत मिरवणुक काढत महामंडलेश्वर मनिषानंद महाराज, हभप अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या हस्ते (Shri Gupteshwar Mandir) श्री गुप्तेश्वरांची महापूजा व आरती करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित भक्तांनी महामंडलेश्वर मनिषानंद महाराज यांना स्नान घालुन अमृत स्नान महोत्सव साजरा केला. (Mahashivratri) महाशिवरात्रीनिमित्त श्री गुप्तेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी उसळल्याने धारासूर येथील गोदावरी नदी काठावर कुंभमेळा भरल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
मंगळवार रोजीच्या मध्यरात्रीपासूनच गंगाखेड शहरासह ग्रामीण भागातून तसेच मराठवाड्याच्या विविध भागातून हजारो भाविकांनी गोदावरी नदी काठावर मोठी गर्दी करत ‘हर हर महादेव’चा जयघोष करत अमृत स्नान करून श्री गुप्तेश्वरांची मनोभावे आराधना केली. श्री गुप्तेश्वर देवस्थान विश्वस्त समिती व ग्रामस्थांच्या वतीने भाविक, भक्तांसाठी महाकुंभ अमृत स्नान (Mahashivratri) व दर्शनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून गोदावरी नदी काठावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती.
महाकुंभ अमृत स्नान व दर्शन झाल्यानंतर धारासूर येथील तरुण मंडळाच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. (Mahashivratri) महाशिवरात्रीच्या पर्वावर आयोजीत महाकुंभ अमृत स्नान व दर्शनाचा आनंद घेण्यासाठी धारासूर येथे गोदावरी नदी काठावर होणारी गर्दी लक्षात घेत सोनपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनासह देवस्थान विश्वस्त समिती पदाधिकारी, ग्राम पंचायत तसेच ग्रामस्थ्यांनी उभारलेल्या स्वयंसेवकांनी ही भाविकांना मोठे सहकार्य केल्यामुळे दिवसभर हजारों भाविकांनी गोदावरी नदी काठावर सुलभपणे महाकुंभ अमृत स्नान करून (Shri Gupteshwar Mandir) श्री गुप्तेश्ववरांचे दर्शन घेतले.