महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जे मंजूर होईनात
लातूर (Mahatma Phule magasvarg) : एनएसएफडीसी योजनेसाठी २०२३-२०२४ मध्ये दाखल केलेल्या मागासवर्गीयांच्या महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची हमी घेण्यास राज्यातील महायुतीचे सरकार तयार होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून मागासवर्गीयांना मिळणारी कर्जे बंद आहेत. महात्मा फुले मागासवर्ग (Mahatma Phule magasvarg) आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे अर्जदारांनी सन २०२३-२०२४ या वर्षी एनएसएफडिसी योजनेतर्गत दाखल केलेल्या कर्जाकरीता महाराष्ट्र शासनाच्या हमीपत्राअभावी अर्जदारांचे कर्ज मंजूर होत नसल्याने भीमसैनिक व आंबेडकरी बांधवानी येथील गांधी चौकात थाळीनाद आंदोलन केले.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनुसुचित जातीतील अनेक गोरगरीब लोकांना व्यवसायासाठी (Mahatma Phule magasvarg) महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांच्याकडे सन २०२३-२०२४ या वर्षी दाखल केलेले एनएसएफडीसी योजनेअंतर्गत अनेक अर्जदारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु सदर कर्जाकरीता महाराष्ट्र शासनाच्या हमीपत्र न दिल्याने सदर कर्ज मंजुर होत नाहीत. कर्जाच्या फाईलींकरीता शासनाचे हमीपत्र तात्काळ देऊन सदर कर्ज फाईली तात्काळ मंजुर करण्याच्या सुचना संबंधित विभागास देण्यात याव्यात अशा विषयाचे निवेदन भीमसैनिक व आंबेडकरी बांधवानी आज गांधी चौक लातूर येथे थाळीनाद आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, (Mahatma Phule magasvarg) महात्मा फुले मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना देण्यात आले.
यावेळी लाला सुरवसे, माजी नगरसेवक नवनाथ आल्टे व राहुल कांबळे, डी.उमाकांत, समाधान शितोळे, विष्णू तांदळे, निलेश मांदळे, विनोद माने, विनय जाकते, रवी गायकवाड, श्रृंगारे अमोल, कैलास कांबळे, सुरज सुरवसे, दिपक सिरसाठ, महेश जाधव, पांडुरंग आदमाने, मुरली गायकवाड, विलास चक्रे, परमेश्वर चव्हाण, राहुल सरवदे, प्रफुल्ल किर्ते, सचिन कांबळे, महेंद्र कांबळे, साहेबराव गायकवाड, लखन धावारे व अनेकजण सहभागी होते. गेल्या दोन वर्षांपासून मागासवर्गीयांची या कर्ज प्रकरणांसाठी ससेहोलपट होत आहे. अनेक, वारंवार चकरा मारुनही सरकार मागासवर्गीयांचे प्रश्न मार्गी लावत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.