परभणी (Parbhani):- थकीत वीज देयकासाठी महावितरणने(distribution) शुक्रवार २१ जून रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राहटी आणि कारेगाव येथील वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसर, राजगोपालाचारी उद्यान, ममता कॉलनी येथील जलकुंभ कोरडे पडले आहेत. प्रभाग समिती क – अंतर्गत येणार्या बहुतांश परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
राहटी, कारेगाव जलशुध्दीकरण केंद्रावरील पाणी वितरण विस्कळीत
महावितरण थकीत वीज देयकासाठी पाणी पुरवठ्याची वीज (Electricity) खंडीत करत आहेत. सलग सुट्टीचे दिवस पासून वीज तोडल्या जात आहे. त्यामुळे महापालिकेला वीज देयक भरणे अवघड होत आहे. जून महिन्यात मनपाने जवळपास ३० लाखाचे देयक भरले. तरी देखील वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई (action) करण्यात आली आहे. ज्या भागातील वीज तोडण्यात आली आहे. त्या भागात प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्यांची निवासस्थाने आहेत. मागील दोन दिवसापासून या भागात पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्यांबरोबर सामान्य नागरीकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
विद्या नगरातील कामामुळे वेळापत्रक कोलमडले
विद्यानगर येथे मुख्य जलवाहिणीवर गळती लागली होती. त्याचे काम मनपाने हाती घेतले होते. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले. प्रभावती नगर, ईनायत नगर, जुना पेडगाव रोड, सहकार नगर या भागात मागील नऊ दिवसापासून पाणी आलेले नाही.ज्या भागात पाणी पुरवठा होत आहे. तो कमी दाबाने होत असल्याने नागरीकांची अडचण होत आहे.
दरवेळसची झाली अडचण
शहराला नवीन योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. पाणी असून देखील तांत्रिक अडचणीमुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडत आहे. दरवेळेसच असा प्रकार होत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
आयुक्तांनी पत्र द्यावे, महावितरणची भुमिक
थकीत देयकासाठी महावितरणकडून आयुक्तांच्या नावे पत्र व्यवहार केला जातो. मात्र मनपाकडून विद्युत अभियंता(Electrical Engineer), शहर अभियंता विभाग उत्तराचे पत्र महावितरणला पाठविते. आता महावितरणने महापालिकेला पत्र दिले आहे. वीज जोडणी ही आयुक्तांच्या नावे आहे. त्यामुळे आयुक्तांनी पत्र द्यावे, विद्युत अभियंता, शहर अभियंता यांच्या पत्राची दखल घेतल्या जाणार नाही अशी भुमिका महावितरणने स्पष्ट केली आहे.