मुंबई:- पावसाळी अधिवेशनाच्या(Monsoon sessions) सहाव्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ‘कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने (Strong protests) केली.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाची निदर्शने
मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री.विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. गरीबी शेतकऱ्याच्या उश्याला महायुती सरकार अदानीच्या खिशाला, कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा, मुंबई को किसको बेचा अदानी को बेचा, भ्रष्टाचारात नंबर वन महायुती सरकार आणखी कोण..?
स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी?
स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी, गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला महायुती सरकार अदानीच्या खिशाला अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून महायुती सरकारला घेरल. जनतेचा पैसा अदानीच्या खिश्यात टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,चाळीस टक्के खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर (Prepaid meter)ग्राहकांच्या डोक्यावर मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,खोके सरकार हाय हाय,अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.