मंगरुळपीर (Washim) :- ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ४ वर्षीय २ अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या (torture) निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी दुपारी निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील वाढती गुन्हेगारी , महिला व मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महाविकास आघाडीच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला . या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Balasaheb Thackeray group), कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील संपूर्ण तालुका भरातील पदाधिकारी , कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.