सुसंवाद बैठकीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा सूर
परभणी/गांगाखेड (Gangakhed Assembly Constituency ) : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीची गांगाखेड विधानसभेची उमेदवारी माजी आमदार सिताराम घनदाट यांनाच मिळावी असा सूर मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी येथील संपर्क कार्यालयात आयोजीत सुसंवाद बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतून निघाला आहे.
गांगाखेड विधानसभा मतदार संघातून (Gangakhed Assembly Constituency) निवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच चालु असल्याने विधानसभा निवडणूक जवळ आली तरी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला नाही यामुळे गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व मा.आ. घनदाट मामा मित्र मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सुसंवाद बैठक मंगळवार रोजी घनदाट मामा यांच्या संपर्क कार्यालय परिसरात आयोजीत करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस भरत दादा घनदाट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीस युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, विधानसभा अध्यक्ष अशोकराव बोकारे, गोपीनाथराव तुडमे, गंगाखेड तालुकाध्यक्ष उद्धवराव सातपुते, पुर्णा तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, पालम तालुकाध्यक्ष वसंतराव सिरस्कर, गंगाखेड शहराध्यक्ष सय्यद जमीर, पुर्णा शहराध्यक्ष प्रताप कदम, पालम शहराध्यक्ष इमदाद खान पठाण, ॲड. विजयराव शिंदे, सदाशिव आप्पा ढेले, जालिंदर हत्तीअंबीरे, माजी नगराध्यक्ष शेख जाकीर, नगरसेवक बालाजी कदम, अखिल भाई, बाबुराव तांदळे, जिया खान पठाण, मंचकराव मुंडे, तुकाराम लोखंडे, विनायक राठोड, शेर खान पठाण, शेख मुस्तफा, संतोष जाधव, विक्रम काळे, बळीराम चौरे, दयानंद कदम, रामकिशन शिंदे, भगवान पाटील, राजू नारायणकर, ओमकार आंधळे, शिवानंद गव्हाणे, विठ्ठलराव सातपुते, आत्माराम सोडनर, अदनान खान आदींसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुसंवाद बैठकीत बोलतांना मतदार संघातील सद्यस्थितीवर भाष्य करीत गंगाखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार टिकविण्यासाठी माजी आ. घनदाट मामा यांना आमदार करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले तर लोकसभा निवडणुकीत घनदाट मामा तसूभर ही कमी पडले नाही. मतदार संघात तीन महिने तळ ठोकून महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मतदान देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगत मतदार संघातील सर्व सामन्यांची कामे करतांना घनदाट मामा यांनी स्वतःचे काम समजून कामे केली.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अनुदानीत शैक्षणिक संस्था उभारून देत संस्थाचालक केल्याचे मनोगत व्यक्त करीत माजी आ. घनदाट मामा सारखा लोकनेता आजपर्यंत पहिला नसल्याचे सांगत हि निवडणूक अत्यंत अतितटीची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची असल्याचे सांगत घनदाट मामा यांनाच उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा विधानसभा मतदार संघातील गंगाखेड, पालम व पुर्णा या तिन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे व मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सुसंवाद बैठकीत बोलतांना व्यक्त करीत गंगाखेड विधानसभेचे आमदार घनदाट मामाच रहावे अशी इच्छा सर्व जाती धर्मातील मतदारांच्या मनामध्ये असल्याचे बोलत तुतारी असो की मशाल कोणत्याही चिन्हाची उमेदवारी घनदाट मामा यांना द्यावी असे आवाहन हि यावेळी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.