भारतीय राज्यघटनेची उद्देशिका हातात घेऊन महाविकास आघाडीची निदर्शने
मुंबई (Mahavikas Aghadi) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून घोषणा दिल्या. या विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आक्रमक झाली. “घाबरले रे घाबरले भाजप वाले घाबरले”, ‘मनुवाद हटाव संविधान बचाव’, अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
मनुवाद हटाव संविधान बचाव
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) विरोधात लोकसभेतील भाषण नंतर खोटं नेरेटीव्ह सेट करण्यात आले त्याला विरोध म्हणून आज (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात निदर्शने केली.