महाविकास आघाडीचे राजमार्ग प्राधिकरण यांना निवेदन
नांदगाव पेठ (Mahavikas Aghadi Rastaroko Andolan) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईमधील पाच टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना टोल मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि आजपासून तो अंमलात देखील आणला मात्र याच धर्तीवर मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील टोल नाक्यावरून तसेच नांदगाव पेठ येथील आयआरबीच्या टोल नाक्यावरून चारचाकी वाहनांना टोलमुक्त करा या मागणीसाठी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीने नांदगाव पेठ येथील टोलनाक्यावर रस्ता रोको आंदोलन (Rastaroko Andolan) केले. यावेळी टोल नाक्यावर वाहने देखील अडविण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकतर्फी निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारचा यावेळी निषेध केला.
टोल नाक्यावर थांबविली वाहने, कार्यकर्त्यांची निदर्शने
नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावरून देखील हजारो शेतकरी, व नागरिकांची चारचाकी वाहने जातात. एकीकडे महागाई आकाशाला भिडली असतांना एका गावातुन दुसऱ्या गावात जातांना दोनशे रुपयांचा फटका नाहक नागरिकांना बसतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय केवळ मुंबईपुरताच का असा सवाल सुद्धा आंदोलकांनी उपस्थित केला आहे. मुंबई प्रमाणे महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्यावर व नांदगाव पेठ येथील टोल नाक्यावर चारचाकी वाहनांना टोल मुक्त करा, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचेशुल्क आकारण्यात येऊ नये अश्या आशयाचे निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना दिले आहे.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील वाहने अडवून यावेळी प्रचंड घोषणाबाजी केली, सरकार विरोधात तीव्र निदर्शने करत संपूर्ण राज्यातील वाहनांना टोलमुक्त करण्याच्या घोषणा दिल्या. येत्या दोन दिवसात नांदगाव पेठ येथील टोल चारचाकी वाहनांना मुक्त केला नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.यावेळी टोल नाक्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी तातडीने आंदोलनस्थळ गाठून आंदोलकांशी चर्चा केली व वाहतूक सुरळीत केली.
यावेळी (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे प्रा. मोरेश्वर इंगळे, संजय चौधरी, दिलीप चौधरी, बाळासाहेब देशमुख, नितीन हटवार, अरुण राऊत, राजेश बोडखे, अमित गावंडे, पंकज शेंडे, चंदू राऊत, विनोद डांगे, शशी बैस, शेख तौसिफ, आनंद लोहोटे, नितीन वैष्णव, ओम राऊत, मो. नसीम खान, बाळासाहेब राऊत, अनिल कीर्तकार,संजय नागोणे, ज्ञानेश्वर बारस्कर यांसह शेकडो पदाधिकारीव कार्यकर्ते उपस्थित होते.