पुसद (Sanjay Deshmukh) : नुकत्याच संपन्न झालेल्या (Lok Sabha elections) लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. गेल्या पंचवीस वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील हक्काचा खासदार संजय उत्तमराव देशमुख (Sanjay Deshmukh) यांच्या रूपाने मतदार संघाला मिळाला आहे. हे विशेष. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेच्या (LokSabha constituency) या निवडणुकीच्या महाउत्सवांमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार म्हणून (Sanjay Deshmukh) संजय उत्तमराव देशमुख हे उभे होते. यांच्यासह अजून 15 उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे ठाकले होते.
प्रथम सरळ सरळ वाटणारी निवडणूक नंतर कठीण वळणावर पोहोचली महायुती व (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचे रान उठवले. मात्र यंदा झालेली निवडणूक ही मतदारांनीच हातामध्ये घेतल्याचे चित्र दिसत होते. त्यामध्ये माजी खासदार भावना गवळी (MP Bhavna Gawli) यांची नाराजी महायुतीच्या उमेदवाराला भोवली हे आता या निकालावरून स्पष्ट झाले आहे. तिकीट कापून इतर उमेदवाराला उभे करण्यात आले. ते यवतमाळ वाशिम लोकसभेच्या मतदारसंघातील मतदारांनाही रुचले नव्हते. तर महाविकास आघाडीचे (Sanjay Deshmukh) संजय देशमुख यांची उमेदवारी घोषित होण्याअगोदरच. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा यवतमाळ वाशिम मतदार संघामध्ये संवाद दौरा यशस्वीरित्या संपन्न झाला होता त्याचा मोठा लाभ महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांना मिळाला. आणि चार जून रोजी जाहीर झालेल्या निकालामध्ये ते मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले.
दि. 14 जून रोजी मतदारांचे आभार मानण्याकरिता व महाविकास आघाडी तर्फे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) यांचा पुसद मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, तर शहरातील विविध भागातून त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली, ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचताना दिसत होते. शहरातील विविध महामानवांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. तर यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी करण्यात आली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या विजय रॅलीमध्ये खासदार संजय देशमुख, ऍड आशिष देशमुख, डॉ. मोहम्मद नदीम, युवा नेते ययाती नाईक, माधवराव वैद्य, रंगरावजी काळे यांच्यासह सुधीर देशमुख इत्यादी मान्यवर खुल्या जीपमध्ये विराजमान होते, हे विशेष