पत्रकार परिषदेत डॉ. राम चव्हाण यांनी दिली माहिती
मानोरा (Manora Assembly Election) : मागील पंचवार्षिक निवडणूकीत कारंजा – मानोरा विधानसभा (Assembly Election) मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढविलेली आहे. यावेळीही स्थानिकच्या मुद्यावर (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागीतली असुन शिवसेना उबाठा पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविणार, अशी माहिती मानोरा येथे पत्रकार परिषदे घेऊन डॉ. राम चव्हाण (Dr. Ram Chavan) यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. चव्हाण (Dr. Ram Chavan) म्हणाले की, मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल परब यांच्यासोबत मागील चार वर्षांपासून काम करत आहे. सर्व धर्म समभावचा नारा अंगी बाळगून समाजकारणातून राजकारणात उतरलो असुन मतदार संघातील सर्वसाधारण, गोर गरीब रुग्णांना मुंबईत वैद्यकीय क्षेत्रात सहारा देत आजपर्यंत मदत करीत आहे. स्थानिक मतदार संघातील असल्याने मागील (Assembly Election) विधानसभा निवडणुकीत ग्राउंड लेवलवर गाव अन् गाव पिंजून काढत कोरोना काळात मोफत आरोग्य शिबीर, औषधी वाटप करून गोर गरीबांना सेवा दिलेली आहे.