अमरावती/मुंबई (Mahavitaran) : प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली असून निवड झालेल्या गावांना येत्या दोन महिन्यात सौर उर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना 3 किलोवॅट पर्यंत 78000 रुपयांची सबसिडी देण्यात येणार असून पाणीपुरवठा व दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्यगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निवासी घरगुती ग्राहकांसाठी प्रति किलोवॅट 30,000 रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. 18,000 अनुदान मिळते. तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. 78,000 पर्यंत मर्यादित आहे. विशेष म्हणजे सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील आदर्शगाव मान्याचीवाडी ह्या गावाला लवकरच शंभर टक्के सौर उर्जेव्दारे विद्युत पुरवठा करण्यात येणार असून हे गाव लवकरच सौरग्राम म्हणून नावलौकीकाला येणार आहे.
महावितरणव्दारे शंभर टक्के सौर उर्जेसाठी निवड करण्यात आलेल्या गावांची नावे कंसात दिलेली आहे – जालना जिल्हा (पातोडा,दारेगाव), बीड जिल्हा (नानदी, आनंदवाडी), लातूर जिल्हा (नवीन आदर्श कॉलनी, मयूरबन सोसायटी), हिंगोली जिल्हा (सुलदळी गोरे, दातेगाव ), नांदेड जिल्हा ( हाडोळी,दवणगिर), परभणी जिल्हा ( आंबेटाकळी, मुरूमखेडा), पेण मंडळ (पाडवी पठार, वडवल ), वाशी मंडळ ( नेरेपाडा गाव, सिवानसाई गाव), धुळे जिल्हा ( कलगाव, नाथे), जळगाव जिल्हा ( निंबोल, पातोंडी), नंदुरबार जिल्हा (मोहिदा, ब्राहमणपुरी), कल्याण मंडळ-1 ( शिरवली कुंभारली), कल्याण मंडळ-2 (गोलभान, मोहोप ), पालघर जिल्हा ( अक्करपट्टी, कोलगाव), वसई मंडळ (शिवनेरी, निर्वाण ), रत्नागिरी जिल्हा (फुरुस, असूर्डे), अहमदनगर जिल्हा ( पारेगाव, हिवरे बाजार), मालेगाव मंडळ (वाके, निंबोळा ), नाशिक मंडळ (कोनांबे, दारणा सांगवी), अकोला जिल्हा ( सौंदाळा, सांगलुड), बुलढाणा जिल्हा (बजरंग नगर-सागवान एरिया, सावजी लेआउट, सुताळा खुर्द), वाशिम जिल्हा ( झकलवाडी, पारवा ), अमरावती जिल्हा (नवाथे, काठोरा ), चंद्रपूर जिल्हा ( सोमनाथ, आनंदवन), गडचिरोली जिल्हा (कोंढाणा तुंबडी मेंढा ), भंडारा जिल्हा (भोसा, दहेगाव ), नागपूर ग्रामीण मंडळ (चिखली,सिंधी ), नागपूर शहर मंडळ ( किरमीती भारकस, कॉस्मोपॉलिटन), वर्धा जिल्हा (नागझरी, नेरी मिर्जापुर ), बारामती मंडळ (वांजरवाडी कुंभारकर वस्ती, गणेश रोड नानगाव), सातारा जिल्हा ( मान्याची वाडी), सोलापूर जिल्हा ( चिंचणी, औज), कोल्हापूर जिल्हा (शेळकेवाडी, पिराचीवाडी ), सांगली जिल्हा (झुरेवाडी निमसोड ), गणेशखिंड मंडळ ( शिवतीर्थ नगर, सेक्टर 25 आहे. निगडी),