परभणी/पूर्णा(Parbhani) :- तालुक्यातील गौर परिसरात तुटलेल्या विद्युत वाहिनीचा(electrical duct) स्पर्श झाल्याने एका शेतकऱ्याची म्हैस दगावल्याची घटना आज बुधवार दि.10 जुलै रोजी दुपारी 12:30 च्या सुमारास घडली आहे. या घटनेत शेतकरी (farmer) लक्ष्मण बालाजी दिवडे यांच जवळपास एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान (economic loss) झाले आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून महावितरणाच्या विद्युत वाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी वाहिण्या जीर्ण झाल्या आहेत.
पूर्वीचे कोणतेही कामे केले नसल्याने विदयुत अपघाताचे प्रमाण वाढले
महावितरण कडून मान्सून (monsoon) पूर्वीचे कोणतेही कामे केले नसल्याने विदयुत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या घटनेत एक लाख रु किंमतीची गाभण म्हैस तुटलेल्या विदयुत तारांचा स्पर्श झाल्याने तडफडून मृत्यू झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच तुटलेल्या वाहिन्यांची जोडणी केली असती तर ही घटना टळली असती.या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून महावितरण ने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी दिवडे यांनी केली आहे.




