अध्यक्षपदी विलास काटेखाये यांची वर्णी
भंडारा (Bhandara Dairy Association) : भंडारा जिल्हा दुग्ध संघाच्या १२ संचालक पदांकरिता २८ जून रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप समर्थित सहकार विकास पॅनल (Cooperative Development Panel) व काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल यांच्यात झालेल्या थेट लढतीत दोन्ही पॅनलचे ६-६ उमेदवार विजयी ठरले. दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्याने (Bhandara Dairy Association) जिल्हा दुग्ध संघावर कोण झेंडा फडकवणार? अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सूकता शिगेला पोहचली होती.
६ विरूध्द ५ मताने विवेक पडोळे यांचा पराभव
दि.३० जुलै २०२५ रोजी झालेल्या (Bhandara Dairy Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुती समर्थित पॅनलचे विलास काटेखाये यांनी काँग्रेस समर्थित विवेक पडोळे यांचा ६ विरूध्द ५ मताने पराभव करीत अध्यक्षपदी विराजमान झाले. झालेल्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित पॅनलचे एक संचालक अनुपस्थित होते. भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघावर राष्ट्रवादी नेते खा. प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) , माजी राज्यमंत्री आ. डॉ. परिणय फुके (MLA Parinay Phuke) यांच्या नेतृत्वातील महायुतीने वर्चस्व कायम ठेवला आहे.
काँग्रेस समर्थित पॅनलचे एक संचालक अनुपस्थित
सहकार क्षेत्रातील (Bhandara Dairy Association) भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खा. प्रफुल्ल पटेल (MP Praful Patel) , माजी राज्यमंत्री आ. डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वात महायुती समर्थित सहकार विकास पॅनल तर आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनल यांच्यात थेट निवडणूक पार पडली. २८ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. यात सहकार विकास पॅनलचे ६ तर काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचे ६ उमेदवार विजयी झाले.
यात सहकार विकास पॅनलचे हितेश सेलोकर, विलास काटेखाये, मनोहर लंजे, विलास शेंडे, अनिता तितिरमारे, अस्मिता शहारे विजयी झाले. तर शेतकरी विकास पॅनलचे नरेश पोटफोडे, मुकुंदा आगाशे, शरद कोरे, आशिष पातरे, विवेक पडोळे व आशिष मेश्राम विजयी झाले. दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीच्या आधारे अध्यक्षपदाची निवड होईल असे राजकीय वर्तुळात चर्चा केल्या जात होत्या. अध्यक्षपदासाठी दोन्ही पॅनलमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून आली.
महिनाभरानंतर आज ३० जुलै रोजी अध्यक्षपदाची (Bhandara Dairy Association) निवडणूक घेण्यात आली. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, आ.परिणय फुके (MLA Parinay Phuke) यांच्या नेतृत्वातील महायुतीप्रणीत सहकार विकास पॅनलकडून विलास काटेखाये तर काँग्रेसप्रणीत शेतकरी विकास पॅनलचे खा. प्रशांत पडोळे यांचे बंधू विवेक पडोळे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. यावेळी महायुतीप्रणीत पॅनलचे ६ संचालक तर काँग्रेसप्रणीत शेतकरी पॅनलचे ५ संचालक उपस्थित होते. तर काँग्रेसप्रणीत पॅनलचे मोहाडी तालुक्यातील नरेश पोटफोडे हे संचालक गैरहजर राहिले.
झालेल्या निवडणुकीत विलास काटेखाये यांना ६ तर विवेक पडोळे यांना ५ मते मिळाली. विलास काटेखाये यांनी ६ विरूध्द ५ मतांनी विवेक पडोळे यांचा पराभव करीत दुग्ध संघावर महायुतीचा झेंडा फडकविला. दोन्ही पॅनलला समसमान जागा मिळाल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरश निर्माण झाली होती. दोन्ही पॅनलमध्ये जोरदार रस्सीखेच होती. मात्र, काँग्रेसप्रणीत पॅनलचे एक संचालक निवडणुकीदरम्यान गैरहजर राहिल्याने या निवडणुकीत काँगे्रसला जबर हादरा बसला.
गैरहजर संचालकाचा शोधाशोध करण्यात आला. त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. जर (Bhandara Dairy Association) अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान नरेश पोटफोडे हे हजर राहिले असते तर चित्र कदाचित बदलले असते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. महायुती समर्थित विलास काटेखाये यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. विजयानंतर महायुतीचे नेते पदाधिकार्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी माजी राज्यमंत्री आ. डॉ. परिणय फुके (MLA Parinay Phuke), माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे सुनील फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे आदी उपस्थित होते.