मुंबई (Maharashtra Vidhan Sabha Election) : महाराष्ट्रातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेली भाजप आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर वेगळी झाल्याचे चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे यावेळच्या (Maharashtra Vidhan Sabha) विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने या पदावर आपला दावा ठोकण्याची तयारी केली आहे. सध्या 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपला मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांसह 114 आमदारांचा पाठिंबा आहे. तर महायुती सरकारला राष्ट्रवादीच्या 42 आमदारांचा आणि शिवसेनेच्या 39आमदारांचा पाठिंबा आहे. तरीही (Mahayuti Aghadi) महायुतीमध्ये सर्वात कमी आमदार असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्याची भाजपची रणनीती
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhan Sabha) महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्यासाठी भाजपने आपली रणनीती तयार केली आहे. पक्षाला आशा आहे की, ते निश्चितपणे 100 हून अधिक जागा जिंकतील आणि यासह मुख्यमंत्रिपदावर त्यांचा नैसर्गिक दावा असणार आहे.
शिवसेनेची मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड नाही
ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असतील, त्याला मुख्यमंत्रीपद मिळावे. असेही भाजपने अलीकडेच म्हटले होते. दुसरीकडे, मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
भाजप 160 जागांवर निवडणूक लढवणार
भाजपच्या नेत्याने सांगितले की, पक्ष विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha) महायुती आघाडीत (Mahayuti Aghadi) किमान 160 जागा लढवू इच्छितो. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाची रणनीतीही उघड केली.