आंदोलनात महिलांनी केली नारेबाजी
नागपूर (Mahila Congress Protests) : शहर (जिल्हा) महिला काँग्रेसतर्पे सीताबर्डी स्थित व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ प्रदेश महिला कॉग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात महिला कॉग्रेस शहराध्यक्ष अॅड. नंदा पराते यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला व बाल कल्याण विभागाच्या जि.प. सभापती कुंदा राऊत यांनी भाग घेतला.
अॅड. नंदा पराते म्हणाल्या की, भाजप सरकारने गॅस सिलेंडर व जीवनावश्यक वस्तुचे दर वाढवून महिलांना त्रास असह्य होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) लाखो अर्ज प्राप्त झाल्यानंतरही महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाालेली नाही. आगामी विधानसभा निवडणूकीतून आपला असंतोष महिला दाखवितील असा इशारा (Mahila Congress) आंदोलक महिलांनी दिला. महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणूकीच्या तोंडावर लागू केली.
या योजनांसाठी महिलांचे अर्ज मंजूर करून महिलांच्या बँक खात्यात छदामही आला नाही तरीही येत्या विधानसभा निवडणूकीत महिलांनी महायुती सरकारला आशिर्वाद म्हणून मतदान दिले नाही तर गरीब महिलांकडून १५०० रुपये परत घेवू अशी महायुतीच्या नेत्यांनी धमकी दिली आहे. त्याविरोधात नारे- निर्दशने करण्यात येवून त्यांचा निषेध करण्यात आला. त्यावेळी महिलांनी महायुती व भाजपा सरकार विरोधात नारेबाजी करीत (Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसाठी महिलाची फसवणूक करणारे व महिलांना धमकी देणार्यांना अटक झालीच पाहीजे, महिलांची फसवणूक करणे बंद करा, जाती जनगणना झालीच पाहीजे, महिलांची महागाईतून सुटकासाठी मासिक रू. साडेआठ हजाराची महालक्ष्मी योजना लागू करा, महायुती सरकार मुर्दाबाद, जो महिलांओशे टकरायेगा, वो मट्टी मे मिल जायेंगा, महिलांना धमकी देणे बंद करा, महिलांना हक्क मिळालेच पाहीजे अशी नारेबाजी करण्यात आली.
या (Mahila Congress) आंदोलनात कल्पना द्रोणकर, संगीता उपरीकर, गीता हेडाऊ, पूजा बाबर, शकुंतला वट्टीघरे, मंजू धार्मिक, जयश्री धार्मिक, सुरेखा लोंढे, मंजू पराते, माया नांदुरकर, रोशनी नितनवरे, ज्योती जरोंडे, कल्पना गोस्वामी, पूजा देशमुख, डायना लिंगेकर, स्नेहा पेटकर, प्रमिला धामने, वर्षा देशमुख, राजेश्री शिंदे, शशिकला बुरडे, मंदा शेंडे आदी महिला सहभागी झाल्य होत्या.