आ.अमित झनक याच्या कार्यालयासमोर राहुल गांधीच्या फोटोला जोडे मारुन केला निषेध
रिसोड (Rahul Gandhi ) : काँग्रेस आमदारांनी लाडकी बहीण योजना चुकीचे वक्तव्य केल्याने या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रिसोड येथील सिव्हिल लाइनस्थित असलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.अमित झनक यांच्या कार्यालयाच्या बाहेर शिंदे गटाच्या महिला, तसेच कार्यकर्त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) ,तसेच आ. सुनील केदार (MLA Sunil Kedar) यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिदे यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना सुरु केली असून महिलांना दर महा पंधराशे रुपए सुरु करण्यात आले. माझी लाडकी बहीन योजना बंद पाडु ईच्छीणा-या कांग्रेस चे आमदार सुनिल केदार यांनी आमची सत्ता आली तर लाडकी बहीन योजना बंद करु असे वक्तव्य काँग्रेस आमदार केदार यांनी केले होते.
या वक्तव्याने शिवसेना महीला अघाडीच्या वतीन कांग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या कार्यालया समोर संताप व्यक्त करत राहुल गांधी (Rahul Gandhi) व कांग्रेसचे आमदार सुनिल केदार (MLA Sunil Kedar) याच्या विरोधात मिळुन सा-या बहीनी कांग्रेसला पाणी पाजु ,अशा जोरदार घोषणा देत बॅनर वरील प्रतिमेला चप्पल मारत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या वेळी वैशाली येरणे महिला अघाडी जिल्हा प्रमुख वाशिम,शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महादेवराव ठाकरे, सुनिल कायदे, अरुण मगर,शिवाजी खानजोडे कपिल कदम मीनाक्षी नरवाडे रेखा जुनघरे गीता गोळे अनिता देशमुख यमुना ठाकरे यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.