माहूर(Nanded) :- तालुक्यातील सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे यमराज राठोड व त्यांचे दोन सहकारी हे ऊस तोडणीच्या कामासाठी अंबाजोगाई येथे गेले तेथे मुकदम सचिन तिडके यांच्या सोबत ऊस (Kane sugar) तोडीच्या आर्थिक व्यवहारातुन शेतात नेऊन दारु पाजुन दगडाने तोंड ठेचुन खुन (murder) झाल्याची घटना अंबेजोगाई ग्रामीण पो. स्टे हदीत घडली तेथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबेजोगाई ग्रामीण पो. स्टे हदीत घडली तेथे खुनाचा गुन्हा दाखल
आरोपी पसार होऊन सिंदखेड पोलीस स्टेशन (Police Station) हदित दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्या वरुण सिंदखेड पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या दि. २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान डोंगरपिंपराळा शेत शिवारात ता अंबाजोगाई ऊसतोड मुकदम मृतक सचिन तिडके वय ३५ यांची सासरवाडी येथे आरोपी यमराज धरमसिंग राठोड वय ३२ लसणवाडी ता. माहुर, शुभम चंद्रकांत पवार, वय २० नांदेड व करण देविदास राठोड, वय २२ नांदेड या तिघांन विरोधात अंबाजोगाई ग्रा. पोस्टे येथे मृतकाचे वडील शिवाजी तिडके यांनी खुनाची फिर्याद दाखल केली. सदरील प्रकरणी आरोपीचा शोध घेतला असता ते माहुर तालुक्यातील सिंदखेड पो.स्टे हदित दबा धरून बसलेल्याची गोफणीय माहीती सिंदखेड चे ठाणेदार रमेश जाधवर यांना देण्यात आली.
आरोपी जेरबंद माहुरात
त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीसांनी (Sindkhed police) सदर हकीकत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना कळविण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यावरुन दि.२ नोव्हेंबर रोजी पो अधिक्षक अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनात स.पो.नी रमेश जाधवर पो उप निरीक्षक मडावी, पो हे का पठाण, मडावी, हुसेन व शेंडे यांचे पथक आरोपी शोध कामी निघाल्याची भनक आरोपीस लागल्याने तीन्ही आरोपी हे पलाईगुडा गावात ऑटो बसले होते. तो आटो सोडुन पळ काढला त्यांचा पोलिसांनी शेत शिवारात ४ किमी सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी बिड चे पोलिस अधीक्षक (Superintendent of Police) अविनाश कुमार बारगळ यांना दिल्याने आरोपी ताब्यात घेणे करीता अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांचे पथक पोस्टे सिंदखेड येथे दाखल झाले व आरोपीस ताब्यात घेतले.