माहूर (Mahur Crime ) : मौजे हिवळणी नखेगाव फाट्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या २०० मिटर लगत असलेल्या तुळशीराम राठोड यांच्या शेतातील विहीरीवरील इंधनात अज्ञात महिलेचा (Mahur Crime) अर्ध जळालेल्या अवस्थेत मृतदेह (Death body) आढळून आल्याची घटना दि. ५ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. त्या मयत महिलेचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघडकिस आल्याने माहुर पोलिस स्टेशन (police station) येथे अज्ञात विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हिवळणी शिवारातील तुळशीराम राठोड यांच्या शेतात घडलेल्या जळीत कांडातील आरोपीचा छेडा लावण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघने, यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी (Mahur Police )पोलिस कर्मचार्यांना समवेत घेऊन तपासाची चक्रे गतीमान केली. आरोपीचा गोफणीय मार्गाने तपास सुरू असतानाच सदरील महिलेच्या गळ्यावर प्रथम चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर दुपट्ट्याने गळा आवळण्यात आल्यानंतर, तिची ओळख पटू नये, म्हणून तिला जाळून टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदरील मयत महिला ३ महिन्याची गर्भवती (pregnant) होती, असे शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एम. परगेवार यांच्या फिर्यादीवरून खून करणे ,(murder) पुरावा नष्ट करणे, गर्भाला जन्मापासून प्रतिबंध करणे, या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध (Mahur Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास (Nanded Police) पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे करीत आहेत