माहूर/Nanded (Mahur Police) : काळानुरूप गुन्ह्यांचे स्वरूप बदलले असून, मोबाइल, (mobile) संगणक व विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गोळा केलेल्या साक्षी पुराव्यांना सिद्ध करण्यासाठी जुन्या कायद्यातील अनेक तरतुदीनुसार पोलिसांना अडचणी येत होत्या. नव्या कायद्यांमुळे तपास यंत्रणेला गती मिळून गुन्ह्यांच्या प्रमाणातही घट होण्यास मदत होणार आहे असे मत पोलिस निरीक्षक police शिवप्रसाद मुळे यांनी व्यक्त केले. (New law enforcement) नवीन कायद्यांची तोंडओळख करून देतानाच नेमके कोणत्या कायद्यात काय बदल केले आहेत याची सोप्या शब्दांत मुळे यांनी माहिती दिली.
नवीन कायदे अंमलबजावणी माहुर पोलिस स्टेशन येथे मागदर्शन
“नवीन कायदे अंमलबजावणी” (New law enforcement) याविषयावर माहूर पोलीस ठाण्यात विद्यार्थी ,शिक्षक, (Mahur Police) पोलीस पाटील यांच्या उपस्थिती मध्ये दि १ रोजी सायंकाळी ५ वाजता कार्यशाळा घेण्यात आली. यात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे म्हणाले की, अपराधाचे स्वरूप किरकोळ असेल तर अपराध्याला शिक्षा करण्यापेक्षा त्याच्यात सुधारणा करून त्याला समाजात सामावून घेता येईल याचा प्रयत्न नवीन कायद्यात केला आहे. तसेच शिक्षेचे स्वरूपही सामाजिक सेवा अशा पद्धतीचे असेल. ब्रिटिशकालीन (British) भारतीय दंडविधान, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा १ जुलैपासून इतिहासजमा होणार आहे.
आजपासून नवीन कायदे लागू होणार आहेत. तसे शासनाने परिपत्रक (government circular) सुद्धा काढले आहे. या बदलामुळे गुन्ह्यांमध्ये लावण्यात येणारे कलमही बदलणार आहे. यासोबतच दोषारोपपत्र, शिक्षेची तरतूद यात सुद्धा बदल होणार आहे. सरकारने सध्याच्या कायद्यामधील काही कलम रद्द केले असून नव्या कायद्यात काही गुन्ह्यांचाही समावेश केला आहे. नवीन कायद्या मुळे गुन्हेगाराला तांत्रिक व डिजिटल (digital) पुराव्याच्या मदतीने शिक्षा होण्यास मदत मिळेल असे सांगताना विद्यार्थ्यांनी व्हॉट्सॲप ,फेसबुक (Facebook) व इंस्टाग्राम या वर लक्ष केंद्रित न करता आपले ध्येय गाठण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे,समाजमध्यामावरील तंत्रज्ञान नाचा दुरुपयोग न करता सदूपयोग करावा असे ही विद्यार्थ्यांना student मार्गदर्शन करताना सपोनी शिवप्रकाश मुळे म्हणाले. या वेळी नंदू संतान कॉ. शंकर सिडाम, सरफराज दोसानी, विजय आमले , गजानन भारती, विश्वास जाधव अविनाश सातव अर्जुन जाधव यांच्या सह विद्यार्थी अनेक गावची पोलिस पाटील व नागरीकांची उपस्थिती होती.