माहूर (Nanded):- राजन तेली माझ्या विरोधात निवडणूक (Elections) लढले आणि दोन वेळा पराभूत झाले आता त्यांना निवडणूक लढवून हारण्याची हॅट्रिक करायची आहे असे प्रतिपादन श्री रेणुका देवी संस्थान येथे दर्शनासाठी आलेले शिक्षण मंत्री दीपक केसरकर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उतर देताना केले तर सोबतच गोरगरिबांचे कल्याणासाठी प्रथम प्राधान्य देणारे महायुतीचे सरकार बहुमताने येवो अशी प्रार्थना त्यांनी श्री रेणुका माता, श्री दत्तप्रभू, श्री अनुसया माता चरणी केल्याचे त्यांनी वेळी सांगितले.
मंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन
राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यात आली असून मुंबई (Mumbai)मराठवाड्यात विकास कामे झाली असून आता कोकणाकडे लक्ष द्यायचे असल्याने महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जागतिक कीर्ती मिळवेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त करून राजन तेली संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढून ही दोन वेळा माझ्या विरोधात निवडणुकीत पराभूत झाले असून यावेळीही ते उभे राहिल्यास त्यांची पराभवाची हॅट्रिक होईल अशी आशा त्यांनी व्यक्त करून राज्यात झालेल्या विकासाच्या मुद्द्यावरच भाजपा (BJP)सह मित्र पक्षांचेच सरकार येईल असा दावा त्यांनी केला. श्री रेणुका माता मंदिरात मंत्री दीपक केसरकर यांचा विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांचे सर्व विश्वस्त पुजाऱ्यांनी हृदय सत्कार केला तर रेणुका माऊली व्यापारी असोसिएशन तर्फे ही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आ.गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे अध्यक्ष गोविंद केंद्रे शिक्षण विभागाचे (Department of Education) उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडिया केंद्र प्रमुख कानोडे एस एस पाटील सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी सुनील गायकवाड गोपनिय शाखेचे शारदासूत खामनकर ज्ञानेश्वर वेलदोडे सिद्धार्थ नागरगोजे यांच्या सह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.