उपोषणाची धमकी देत निवेदनबाजी
परभणी (Parbhani police) : दैनंदिन कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस अधिकार्याच्या विरोधात सदर अधिकारी भ्रष्ट असल्याचे निवेदन विशेष (Parbhani police) पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले. स्वता : ला पत्रकार म्हणविणार्या सदर इसमाने कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला. १० ऑक्टोबर पासून उपोषण करण्यात येणार होते. तत्पुर्वी या इसमाने पोलीसांना भेटत काही रकमेची मागणी केली. सदरचा प्रकार खंडणीसारखा असल्याचे समजल्यावर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी त्याला पकडून कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. (Parbhani police) पोनि अनिरुध्द काकडे यांनी संबंधीताची चौकशी केली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोनि मनोहर इडेकर यांची उपस्थिती होती. वरिष्ठ अधिकार्यांना घडल्या प्रकाराची सुचना देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
निवेदन देत दबाव टाकण्याचा प्रयत्न
परभणी : शहर वाहतूक शाखेच्या अधिकार्या विरुध्द निवेदनबाजी करत उपोषणाचा इशारा देऊन खंडणी मागण्याचा प्रकार पुढे आला आहे. तोतया पत्रकाराने सदर प्रकार केला असून संबंधीताला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहर वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक असलेले पठाण यांच्या विरुध्द निलंबणाची कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा के.एस.पवळे या तोतया पत्रकाराने दिला होता. उपोषण न करण्यासाठी संबंधीताने पोलीसांना रकमेची मागणी केली. रक्कम मागीतल्यानंतर पोलीसांनी या पत्रकाराला पकडून (Parbhani police) कोतवाली पोलीस ठाण्यात आणले.