राजस्थान (Gas Tragedy) : गटाराची टाकी साफ करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांसह तिघांचा (Gas Tragedy) विषारी वायूमुळे मृत्यू झाला. (Lakhanpur Police) पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना वाचवण्यासाठी टाकीत उतरलेल्या आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात लखनपूर पोलीस ठाण्याच्या (Lakhanpur Police) हद्दीत घडली आहे. आकाश (25) आणि करण (22) हे युवक घरात बांधलेली सेफ्टी टँक साफ करण्यासाठी खाली उतरले. साफसफाई करत असताना अचानक त्याला गुदमरायला सुरुवात झाली आणि ते मदतीसाठी ओरडू लागले.
पोलिसांच्या (Lakhanpur Police) माहितीनुसार, भोलू, नरेश आणि इंद्र त्यांना वाचवण्यासाठी खाली आले. मात्र तेही विषारी वायूमुळे बेशुद्ध झाले. टाकीशेजारी खड्डा खोदून टाकीचा काही भाग फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात (Lakhanpur Hospital) उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला असून, नरेश आणि इंद्रावर उपचार सुरू आहेत.
या (Gas Tragedy) अपघाताबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, या प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्याचे आणि पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या )major accident) दुर्घटनेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी प्रश्न उपस्थित केला असून, पीडितांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणे आणि मृतांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे.”