रिसोड (Mogggaon fire) : तालुक्यातील मोठेगांव येथे दि. 25 मार्च रोजी दुपारी 2. 30 च्या दरम्यान अचानक मोठी आग लागली होती. गांवातील बुरजावर स्थित असलेल्या व अंरविदराव गणेशराव देशमुख व त्यांच्या भांवडाच्या मालकीची असलेल्या जुन्या माडीला अच्यानक आग लागली होती. (Mogggaon fire) आग हि सुरवातीला माडीच्या खाली लागली होती व बघता बघता हि आग लाकडी खांब असल्यामुळे माडीवर आग वर चडली व आगीने पेट घेतला.
सदर माडी हि मानव विरहित असल्यामुळे खुप मोठा अनर्थ टळला. आजु बाजुला भरपुर प्रमानात जनावराचा चारा होता. परंतु गांवातील काही नागरिकानी मोटरपंपच्या साह्यानी पाणी टाकले. (Mogggaon fire) सदर बाब सामाजिक कार्यकर्तो मनोजभाऊ देशमुख यांना माहिती मिळाल्या नतंर ते लगेच घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिस्थीती लक्षात घेता लगेच रिसोड अग्निशमन दलाला माहिती दिली व अग्णीशामक दला चे वाहक अझरुद्दीन व कर्मचारी संजीव पवार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून शेवटी आग आटोक्यात आणली.
सदर (Mogggaon fire) आग विझवण्यासाठी अनिकेत बालासाहेब देशमुख, अभिजीत समाधानराव देशमुख, अजय गोपालराव देशमुख, अजय झनकराव देशमुख,भरत दत्तराव देशमुख , महेश केशवराव देशमुख, ज्ञानेश्वर विठ्ठलराव देशमुख, पवन गणेशराव देशमुख, जगदिश अंरविदराव देशमुख, किशोर अंरविदराव देशमुख, वैभव भिकंनराव देशमुख, विठ्ठल आंनदा कष्टे, एकनाथ आंनदा कष्टे, अणिल प्रभतराव देशमुख आदीनी परिश्रम घेतले व आगिवर नियंत्रित आणले.