पालांदूर-खराशी मार्गावर मोठा अनर्थ टळला
लाखनी (Bhandara) : तालुक्यातील (Palandur-Kharashi Road) पालांदूर-खराशी मार्गावर सकाळी ५ वाजता दरम्यान मोठा अनर्थ टळला. गिट्टी भरून जाणारा टिप्पर स्टेअरींग लॉक झाल्याने अनियंत्रित टिप्पर रस्त्याच्या कडेला उतरून विद्यूत तारांना अडकला. (Power supply) विद्यूत तारा तुटून विज पुरवठा खंडीत झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत विज वितरण कंपनीचे नुकसान झाले.
साकोली येथील प्रदिप वैद्य यांच्या मालकीचा टिप्परमध्ये पाचगाव येथून गिट्टी भरून (Palandur-Kharashi Road) अड्याळ-पालांदूर मार्गे साकोलीकडे जात असताना पालांदूर-खराशी मार्गावर खराशी गावाजवळील वळणावर टिप्परमधील डीझेल संपल्याने गाडी बंद पडून स्टेअरींग लॉक झाले. टिप्पर चालक अमीत पठाण रा. सावरबंद याने टिप्पर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र टिप्पर अनियंत्रित होवून रस्त्याच्या बाजूला विद्यूत रोहित्राच्या तारांना अडकला.
तारा तुटल्याने (Power supply) विद्यूत पुरवठा खंडीत होवून मोठा अनर्थ टळला. यात विज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. माहिती मिळताच विद्यूत विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. विज पुरवठा सुरळीत केला. जर अनियंत्रित टिप्पर (Electric wire) विद्यूत तारांना अडकला नसता तर समोर असलेल्या झाडाला धडक बसून, तसेच जीवंत (Electric wire) विद्यूत तारांच्या स्पर्शाने मोठा अनर्थ घटन्यास वेळ लागली नसती.