नागपूर (Sadgurudas Maharaj) : श्री गुरूमंदिर , ८०, जयप्रकाश नगर नागपूर येथून प्रकाशित होणा-या ‘पत्रभेट-भेट सद्गुरूंशी’ हे आध्यात्मिक मासिक गेली २५ वर्षे अविरत ज्ञानप्रसाराचे कार्य करते आहे. या आध्यात्मिक मासिकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांच्या अंतर्गत शनिवार,२० जुलै रेाजी संध्याकाळी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पत्रभेट – भेट सद्गुरूंशी’ 20 जुलै रोजी परिसंवाद
जयप्रकाश नगर येथील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात सायंकाळी 6 वाजता ‘आजच्या डिजिटल युगात पत्रभेट या आध्यात्मिक मासिकाची आवश्यकता’ या विषयावर होणा-या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. वि. स. जोग राहतील. पत्रभेट मासिकाच्या पुणे निवासी संपादक स्मिता काटेकर, नागपूरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक व स्तंभ लेखिका डॉ. प्रज्ञा पुसदकर, सुप्रसिद्ध कीर्तनकार मोहनबुवा कुबेर आणि वणीचे सुप्रसिद्ध गाणपत्य विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड यांचा सहभाग राहील. या कार्यक्रमाला धर्मभास्कर सद्गुरूदास महाराजांची विशेष उपस्थिती राहणार आहे.पत्रभेट संपादक मंडळाने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरुमंदिरात 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव
रविवार, 21 जुलै रोजी गुरूमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी सकाळी 5.30 वाजता काकडा होईल तर 7.30 वा. टेम्ब्येस्वामी आणि विष्णुदास स्वामी महाराजांच्या पादुकांवर रूद्राभिषेक व उपासना होणार आहे. सकाळी 11 वाजता सद्गुरुदास महाराजांसोबत सत्संग होणार असून महाप्रसाद, उपासना, भजन व एक्का आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रप्रमुख कल्याण पुराणिक यांनी केले आहे केले आहे.