तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती हा भारतातील (India) प्रमुख सणांपैकी एक आहे. संक्रांतीमध्ये लहान मुलांची पतंग उडवायची वेगडीच मजा असते. जणू ते पतंग त्यांना सागते, त्या पतंगाप्रमाणे आपल्या स्वप्नांसोबत उंच भरारी घ्या. मकर संक्रांती भारत आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी हा (Makar Sankranti 2025) सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या केवळ चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो तर कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशात याला फक्त संक्रांती म्हणतात.
बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये हा सण ‘तीला संक्रांती’ या नावानेही प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाला उत्तरायण असेही म्हणतात. 14 जानेवारीपासून सूर्य उत्तरेकडे जाऊ लागतो. या कारणास्तव या सणाला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. वैज्ञानिकदृष्ट्या याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचे उत्तरेकडून दक्षिणेकडे सतत 6 महिन्यांच्या कालावधीनंतर वाकणे. आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. (Makar Sankranti 2025) मकर संक्रांती संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
‘कापणीचा उत्सव’
मकर संक्रांतीचा सण (Makar Sankranti 2025) नवीन पीक आणि नवीन हंगामाच्या आगमनासाठी देखील साजरा केला जातो. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी नवीन पीक कापले जाते. म्हणून शेतकरी मकर संक्रांतीला आभार मानण्याचा दिवस म्हणून साजरे करतात. शेतात गहू आणि भाताचे भरभराटीचे पीक हे शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. परंतु हे सर्व देव आणि निसर्गाच्या आशीर्वादाने शक्य आहे.
पंजाब आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मकर संक्रांती ‘लोहरी’ म्हणून साजरी केली जाते. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती ‘पोंगल’ म्हणून साजरी केली जाते. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मकर संक्रांती ‘खिचडी’ म्हणून साजरी केली जाते. (Makar Sankranti 2025) मकर संक्रांतीला काही ठिकाणी खिचडी बनवली जाते, तर काही ठिकाणी दही चुडा आणि तिळाचे लाडू (Sesame Ladoo) बनवले जातात.