लातूर (latur):- काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्यावर बेताल वक्तव्ये करणाऱ्या भाजपा (BJP)नेत्यांचा निषेध लातूर जिल्हा महिला काँग्रेसने नोंदविला. लातुरात गुरुवारी महात्मा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले.
लातूरमध्ये महिला काँग्रेसचे आंदोलन
यावेळी भाजपा खासदार बोंडे, शिंदे सेना आमदार गायकवाड यांचा निषेध करण्यात आला. जिल्हा महिला काँगेसच्या अध्यक्षा शिलाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिलाताई पाटील यांनी सत्तेवर असलेल्या भाजपा खासदार बोंडे व शिवसेनेचे आमदार गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर बेताल वक्तव्ये केले. त्याचा निषेध करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली. लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही पुन्हा रस्त्यांवर येवून आंदोलन करू, असा इशारा शिलाताई पाटील यांनी दिला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सौ. विद्याताई पाटील, तालुका अध्यक्षा राजमाने, औसा तालुका अध्यक्षा सईताई गोरे, उदगीर शहर कार्याध्यक्ष ज्योती डोळे, जिल्हा पदाधिकारी डांगे, हादवे, मंगला मोरे, डिग्रसे, खोडसे, पतंगे, पल्लवी जाधव आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी होत्या.