परभणीच्या मालेवाडी येथून बेकायदेशिररित्या मुरूम उत्खनन होत असल्याची तक्रार
परभणी/गंगाखेड (Malewadi Gram Panchayat) : तालुक्यातील मालेवाडी येथील सरकारी गायरान असलेल्या स्मशान भूमीच्या जमिनीतून बेकायदेशीररित्या मुरूम उत्खनन (Murum Excavation) होत असल्याची तक्रार दि. २४ जून सोमवार रोजी (Malewadi Gram Panchayat) ग्राम पंचायत सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव संघरत्न गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
तालुक्यातील मालेवाडी (Malewadi Gram Panchayat) येथील सरकारी गायरान गट नं. ४१ मध्ये असलेल्या सार्वजनिक स्मशान भूमीच्या (Cemetery) जमिनीतून गावातील तुळशीदास उत्तम कुकडे व उत्तम कोंडिबा कुकडे हे बेकायदेशीररित्या २ जे.सी.बी. मशीन व ४ ट्रक्टरच्या सहाय्याने रात्रंदिवस मुरूम तसेच दगडाचे उत्खनन करून चोरी करत त्याची स्वतःच्या जागेत साठवणुक करीत असल्याची माहिती दि. १३ जून रोजी तहसिलदार साहेब व नायब तहसिलदार सुनील कांबळे यांना फोनव्दारे देत या गैरप्रकाराबद्दल संघरत्न गायकवाड यांनी तक्रार करून सुद्धा त्यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात नमूद केले.
दि. १३ जून पासून आजतागायत सरकारी गायरानमध्ये असलेल्या सार्वजनिक स्मशान भूमीच्या जमिनीतून बेकायदेशीररित्या मुरूम व दगडाचे उत्खनन (Murum Excavation) सुरूच असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे व (Revenue of Govt) शासनाचा महसुल मोठ्या प्रमाणात बुडून नुकसान असल्याची तक्रार करून शासकीय परवानगी न घेता २५० ब्रास पेक्षा अधिक मुरूम व दगडाचे उत्खनन केल्याप्रकरणी इटीएस मशिनव्दारे मोजणी करून तुळशीदास उत्तम कुकडे व उत्तम कोंडिबा कुकडे यांना नोटीस बजावून रॉयल्टी भरणा करण्याचे आदेश द्यावे व उत्खननामध्ये वापरण्यात आलेल्या २ जे.सी.बी. मशीन तसेच ४ ट्रक्टर चालक, मालकांना दंड ठोठवत बेकायदेशररित्या मुरूम उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी (Malewadi Gram Panchayat) मालेवाडी ग्राम पंचायत सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे (द) युवा जिल्हा महासचिव संघरत्न गायकवाड यांनी केली आहे.
मंदिर कामासाठी मुरूम व दगडाचे उत्खनन
मालेवाडी येथील दरलिंगेश्वर मंदिरात सुरू असलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामासाठी लागणाऱ्या मुरूम व दगडाची (Revenue Administration) महसूल प्रशासनाकडून अधिकृत परवानगी घेऊन सरकारी जमीन, सरकारी विहीर, स्मशान भूमी परिसर तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील तळ्यातून मुरूम, दगड उत्खनन केल्याचे (Malewadi Gram Panchayat) मालेवाडी ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. सरस्वतीबाई उत्तमराव कुकडे यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले.