मल्लिकार्जुन खड़गे यांची मोदी सरकारवर टीका
नवी दिल्ली (Mallikarjur Kharge) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अलीकडेच उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील मुखवा मंदिराला भेट दिली. जिथे त्यांनी गंगा देवीच्या हिवाळी निवासस्थानी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjur Kharge) यांनी टीका केली. गंगा नदीच्या स्वच्छतेवरून खरगे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी गंगा स्वच्छतेची हमी विसरले
नमामि गंगे प्रकल्पात (Namami Gange Yojana) प्रगती नसल्याबद्दल मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjur Kharge) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjur Kharge) यांनी X वर म्हटले की, मोदीजी म्हणाले होते की “माँ गंगेने त्यांना बोलावले आहे” पण सत्य हे आहे की, ते गंगा स्वच्छ करण्याची त्यांची हमी “विसरले” आहेत! नमामि गंगे योजना सुमारे 11 वर्षांपूर्वी 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. गंगा जीवनदायी आहे, भारताला संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा आहे. परंतु (PM Narendra Modi) मोदी सरकारने गंगा स्वच्छतेच्या नावाखाली केवळ गंगा मातेचा विश्वासघात केला आहे.
मोदी जी ने कहा था कि उनको "माँ गंगा ने बुलाया है" पर सच ये है कि उन्होंने गंगा सफ़ाई की अपनी गारंटी को "भुलाया" है !
क़रीब 11 वर्ष पहले, 2014 में, नमामि गंगे योजना लॉंच की गई थी।
🌊नमामि गंगे योजना में मार्च 2026 तक ₹42,500 करोड़ का फंड इस्तेमाल किया जाना था, पर संसद में… pic.twitter.com/nhQzgmGfiO
— Mallikarjun Kharge (@kharge) March 6, 2025
नमामि गंगे योजनेबाबत खरगे यांचे मोदी सरकारवर प्रश्न
मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjur Kharge) म्हणाले की, “नमामि गंगे योजनेत मार्च 2026 पर्यंत 42,500 कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार होता. परंतु संसदेत दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांवरून असे दिसून येते की, डिसेंबर 2024 पर्यंत फक्त 19,271 कोटी रुपये खर्च झाले आहेत. याचा अर्थ असा की, (PM Narendra Modi) मोदी सरकारने नमामि गंगे योजनेतील 55% निधी खर्च केलेला नाही. गंगा मातेबद्दल इतकी उदासीनता का?
मल्लिकार्जुन खड़गे (Mallikarjur Kharge) पुढे लिहितात की, ‘2015 मध्ये मोदीजींनी आमच्या अनिवासी भारतीय मित्रांना ‘स्वच्छ गंगा निधी’मध्ये योगदान देण्याचे आवाहन केले होते. मार्च 2024 पर्यंत या निधीला 876 कोटी रुपये दान करण्यात आले आहेत. परंतु त्यातील 56.7% वापरात नाही. या निधीपैकी 53% निधी सरकारी उपक्रमांकडून मिळणाऱ्या देणग्यांमधून येतो. (PM Narendra Modi) मोदीजी म्हणाले होते की, “माँ गंगेने त्यांना बोलावले आहे” पण सत्य हे आहे की, ते गंगा स्वच्छतेची त्यांची हमी “विसरले” आहेत!