सडक अर्जुनी (Gondia) :- तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी नववर्षाचे शुभपर्वावर १ जानेवारी पासून दोन दिवसीय ‘मामा -भाचा’यात्रेला सुरुवात होत आहे. गिरोला येथील मामा -भाचा देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते, भैय्यालाल पुस्तोडे अध्यक्ष वि.से.स.संस्था यांचे संकल्पनेतून दरवर्षी नववर्षाचे पहिल्या दिवशी गत एकोणवीस वर्षांपासून यात्रेचे आयोजन करण्यात येते. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या या स्थळांचे महत्व असल्याने यंदाही निसर्गरम्य वातावरणात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने भाविक हजेरी लावतील. यात्रा गोंदिया -भंडारा जिल्ह्याचे सिमेवर भरत असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील भाविक (devotee) यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. उल्लेखनिय असे की, मागील १९ वर्षांपासून ही यात्रा भरत असून यात्रेत सहभागी होणार्या भाविकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते.
१९ वर्षांपासून ही यात्रा भरत असून यात्रेत सहभागी होणार्या भाविकांसाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल
गिरोला पासून अवघ्या एक किमी अंतरावर रस्त्यालगत जंगलात ‘टेंभरूण’ प्रजातींची दोन उंचच उंच झाडे आहेत. यातील मोठे झाड ‘मामा’ आणि लहान झाड म्हणजे ‘भाचा’चे प्रतीक म्हणून ओळखले जाते. ही झाडे भाविकांची श्रध्दास्थान असून या देवस्थानचे मदतीकरीता दरवर्षी देवस्थान समिती व सरपंच उमराव कापगते, भैय्यालाल पुस्तोडे अध्यक्ष वि.से.स.संस्था आणि परिसरातील ग्रामस्थांनी १९ वर्षांपूर्वी यात्रेला सुरुवात केली. यात्रा नववर्षाचे पहिल्या दिवशी भरत असल्याने यात्रेकरू धार्मिक श्रध्देसह नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून साजरे करतात. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षाने हे देवस्थान विकासापासून कोसो दूर आहे. या देवस्थान परिसराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. त्यामुळे नववर्षाचे पहिल्या दिवशी या यात्रेत सहभागी होणार्या भाविकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो. यावर्षी १ जानेवारी रोजी घटस्थापना व ज्योत प्रज्वलीत करून यात्रेची सुरुवात होणार असून २ जानेवारी रोजी दहीकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेत धार्मिक प्रवचन, उत्सव व नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेचे आयोजन सरपंच उमराव कापगते, भैय्यालाल पुस्तोडे अध्यक्ष वि.से.स.संस्था व देवस्थान समिती सदस्य शामराव कापगते, सेवकराम चांदेवार, आशिष संग्रामे, दामोधर बांगरे, आशिष दरवडे, प्रशांत कापगते, रामदास दरवडे, रमेश कापगते, हरिचंद वलथरे, राजाराम बांगरे, गुलाब पुसाम, हेमेंद्र तागडे, हेमराज कुंभरे, चंद्रशेखर लंजे, फुलीचंद कापगते, महेंद्र खैरे, विजय माने, मंगरू वलथरे, दिगांबर तागडे, उमेश तागडे, सुनिल कापसे व समस्त गिरोला ग्रामवासी यांनी केले आहे.