लालू यादव यांचा स्पष्ट आग्रह
नवी दिल्ली (India Alliance) : इंडिया आघाडीचे नेतृत्व करत असलेली काँग्रेस कमकुवत होताना दिसत आहे. (India Alliance) इंडिया आघाडीचा भाग असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची इंडिया आघाडीच्या नेत्यापदी निवड करून त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात यावे, असे लालू यादव (Lalu Yadav) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
RJD नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) म्हणाले की, नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या विरोधामध्ये काहीच अर्थ नाही. (Mamata Banerjee) ममता बॅनर्जी यांना (India Alliance) इंडिया आघाडीच्या नेत्या बनवायला हवे. लालू यादव यांचे हे विधान ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपविरोधी इंडिया आघाडीची जबाबदारी घेण्याचा इरादा व्यक्त केल्यानंतर काही दिवसांनी आले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांना इंडिया ब्लॉकचे नेतृत्व करण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह लालू यादव यांनी आज मंगळवारी धरला.
INDIA ALLIANCE
का नेतृत्व @INCIndia
को ही करना है
किसी के बड़बड़ाने से कुछ नहीं होता है
कुछ समझ होनी चाहिए
आदरणीय लालू यादव जी को अब आराम कि जरूरत हैउल्टा सीधा बयान से बचना चाहिए
मुख्यमंत्री जी के लिए दिए गए बयान निंदनीय है#UPSC
लालू प्रसाद यादव pic.twitter.com/zHtVIeHnYH pic.twitter.com/PIxtEGhoyT— Ayush $ingh (@Ayush_singhAs) December 10, 2024
यापूर्वी, लालूंचा मुलगा आणि ज्येष्ठ आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले होते की, “ममता बॅनर्जींसह भारत आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याला आघाडीचे नेतृत्व करण्यास त्यांचा कोणताही आक्षेप नाही”, परंतु निर्णय हा सर्वसहमतीने व्हायला हवा यावर जोर दिला. .
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘ही’ इच्छा
6 डिसेंबर रोजी एका मुलाखतीत सीएम ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी इंडिया अलायन्सची (India Alliance) जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया ब्लॉकच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती आणि संधी मिळाल्यास आघाडीची जबाबदारी घेण्याचा इरादा दर्शवला होता. “मला विचारले तर मी पश्चिम बंगालमधूनच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेऊन इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे”, असे त्या म्हणाले होते.
इंडिया आघाडी
हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्राच्या निवडणुकीत (India Alliance) इंडिया आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून, त्यानंतर युतीतील दरी वाढत आहे. अशा स्थितीत भाजपसोबतच्या एनडीएच्या युतीचा मुकाबला करण्यासाठी स्थापन झालेली इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सातत्याने कमकुवत होत चालली आहे. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासारख्या दिग्गज नेत्याकडे इंडिया आघाडीची कमान सोपवण्याचे समर्थन इंडिया अलायन्समध्ये असणारे आहेत.