पुसद (Pusad) :- तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन (police station) अंतर्गत येत असलेल्या पिंपळगाव (ई.) येथे दि. 15 जूनच्या रात्री अकरा वाजता च्या दरम्यान दारूच्या अंमलाखाली असलेल्या एका व्यक्तिने राहत्या घराच्या वसरीत नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या(suicide) केल्याची घटना घडली आहे.
नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक संतोष ग्यानबा वांझाळ वय 40 वर्ष रा. पिंपळगाव( ई.) हा सतत दारूच्या अमलाखाली राहत होता. दारूच्या नशेतच त्याने आपल्या राहत्या घराच्या वसईमध्ये 15 जूनच्या रात्री अकरा वाजता च्या दरम्यान नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच ठाणेदार देविदास पाटील यांनी बीट जमदार विलास राठोड व त्यांचे सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. त्यांनी रात्रीच पंचनामा करून पंचनामा करून मृतदेह(dead body) पुसद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात(Government Rural Hospital) पोस्टमार्टम (post mortem) करिता दाखल केले. दि. 16 जून रोजी सकाळी मृतदेहाचे पोस्टमार्टम मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात मर्ग करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार विलास राठोड व त्यांचे सहकारी कॉन्स्टेबल(Constable) करीत आहेत.




