4 पत्रकारांना मिळाला वृत्तगौरव पुरस्कार…
बुलडाणा (Manas Foundation) : सहकारामध्ये ईश्वरासारखीच ताकद आहे. राज्यात कुठे नसतील एवढ्या सहकारी संस्था बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. या संस्थांच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्यही घडत आहे. याचसोबत प्रा. डी एस लहाने यांनी सुरू केलेले (Manas Foundation) मानस फाउंडेशनचे कार्य हे देखील विधवांच्या जीवनात बदल घडविणारे असून आगामी काळात या कामाला मोठा वाव असल्याचे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) उर्फ भाईजी म्हणाले. पत्रकार रणजीतसिंग राजपूत, संदीप वानखेडे, कैलास राऊत व शौकत शहा यांना (Manas Foundation) मानस फाउंडेशनच्या (News Honor Award) वृत्तगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाईजींनी पत्रकारिता व समाजकारण यावर प्रभावी भाष्य केले.
जिल्हा पत्रकार भवन बुलढाणा याठिकाणी “वृत्तगौरव पुरस्कार” वितरण सोहळा 9 ऑगस्ट रोजी थाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसाई परिवारचे अध्यक्ष डॉ.वसंतराव चिंचोले होते. तर बुलढाणा अर्बन सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, व्हाईस ऑफ मीडियाचे राज्याध्यक्ष पत्रकार अनिल म्हस्के, शासकीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे, ज्येष्ठ पत्रकार राजेश देशमाने, मनसेचे नेते अमोल रिंढे, शिवसेना उबाठा गटाच्या महिला जिल्हाप्रमुख जिजाबाई राठोड, आयोजक (Manas Foundation) मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर, शाहीनाताई पठाण यांची उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना भाईजी (Radheshyam Chandak) म्हणाले, पत्रकारिता हे खूप मोठे माध्यम आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारांना म्हटले जाते. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी ही मोठी आहे. पत्रकारांना समाजामध्ये मानसन्मान दिल्या जातो. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक अभ्यासू आणि वैचारिक व्यक्तिमत्व असाच असतो. त्यामुळे पत्रकारांनी नवनवीन ज्ञान संपादन केले पाहिजे. जागतिक भाषांचा अभ्यास करून परिसरापुरते मर्यादित न राहता स्वतःला अद्यावत केले पाहिजे. काही पत्रकार पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन सामाजिक कार्य करतात, ही मोठी गोष्ट आहे. अशा पत्रकारांचा गुणगौरव करणे हे सामाजिक जाणीवेतून महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पत्रकाराविषयी काही अपेक्षाही व्यक्त केल्या. मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची भूमिका विशद केली. मानस फाउंडेशन करीत असलेले कार्य आज राज्यस्तरीय झाले आहे. बुलढाणा शहरातून सुरुवात झालेल्या या रोपट्याचे मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ, पत्रकारांची भूमिका मौलिक असल्याचे सांगून लहाने यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकार बांधवांचे अभिनंदन केले. तसेच (Manas Foundation) मानस फाउंडेशनच्या वतीने आगामी काळात विधवा भगिनींसाठी राज्यस्तरीय मेळावा बुलढाण्यात आयोजित करण्याचा संकल्प केला.
या संकल्पनेला चांडक यांनीही दुजोरा देत शक्य ती मदत देण्याचे आश्वासन दिले. पत्रकार गणेश निकम यांनी आयोजनाची भूमिका मांडली. मानस फाउंडेशनला राज्यभर पोहचविण्याच कार्य मिडीयाने केले, त्यामुळे सर्व पत्रकार बांधव सत्कारास पात्र असल्याचे ते म्हणाले. प्रा लहाने यांच्या संकल्पनेतून सुरू असलेला विधवा परिषदेचा उपक्रम हा केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित उपक्रम नसून आगामी काळात याची नोंद इतिहास घेईल, असे निकम म्हणाले. पत्रकार राजेंद्र काळे व राजेश देशमाने यांनी बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या प्रवासावर नजर टाकली.
सत्काराला उत्तर देताना पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांनी (Manas Foundation) मानस फाउंडेशनच्या कार्याचे ऋण व्यक्त केले तर ग्रामीण भागातील पत्रकारितेचा केलेला सन्मान महत्त्वाचे असल्याचे पुरस्कार प्राप्त कैलास राऊत त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमासाठी मानस फाउंडेशनच्या अनिता कापरे, प्रतिभा भुतेकर, सुरेखा सावळे, प्रज्ञा लांजेवार, सौ. ज्योती पाटील, ऍड. संदीप जाधव, पंजाबराव गवई, गौरव देशमुख, कडूबा सोनवणे, दिनकर पांडे, गजानन मुळे, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले. संचलन मनीषा वारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.शहीणा पठाण यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.
ज्ञान अद्ययावत करा
पत्रकारिता करतांना येणारी आव्हाने पेलण्याच सामर्थ्य आपल्यात निर्माण व्हावे, यासाठी पत्रकारांनी स्वतःला काळानुरूप ‘अपडेट’ केले पाहिजे. सामाजिक, राजकीय विषयासोबत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय विषयाचा सखोल अभ्यास व (Manas Foundation) जागतिक संवादाचे माध्यम भाषांचे ज्ञान मिळवल्यास पत्रकारितेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच जसे तीन वर्षातून प्रशिक्षण होते, पडताळणी होते. त्याच पद्धतीने पत्रकार बांधवांसाठी नवनवीन ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाची गरज पूर्ण केल्यास परिणामकारक पत्रकारिता करणे अजून चांगल्या पद्धतीने शक्य होईल. जे पत्रकार समाजाभिमुख कार्य करतात त्यांचा गुणगौरव देखील गरजेचा असल्याचे सांगून पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) यांनी स्वागत केले.