परभणी (Manaswini Group) : दैनिक देशोन्नती मनस्विनी महिलांच्या (Manaswini Woman) वतीने ’झाडे लावा, झाडे जगवा’, या उपक्रमात महिलांसाठी ही खुली स्पर्धा घेण्यात येत आहे. २३ जून रोजी स्पर्धेला सुरुवात झाली असून या उपक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. स्पर्धेत सहभागी महिलांना पाच झाडे मोफत देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा.
महिलांसाठी खुली स्पर्धा, मनस्विनीच्या उपक्रमास प्रतिसाद
दिवसें दिवस पर्यावरणाचा होणारा र्हास वेळीच रोखण्याची झाडे लावण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आपलाही यात खारीचा वाटा असावा या हेतूने मनस्विनीच्या वतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व महिलांकरिता ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. (Online registration) नोंदणी केल्यानंतर महिलांना एक कुपन देण्यात येईल. वाढता प्रतिसाद पाहता ही कुपन ऑनलाईनसुध्दा पाठविली जातील. कुपन दाखवून पाथरी रोडवरील सरदेशपांडे अॅग्रो नर्सरी, सौ.अलका दळवी यांचे निवासस्थान म्युनिसीपल कॉलनी, दर्गा रोड तसेच सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह, कल्याण नगर, वसमत रोड परभणी या तीन ठिकाणी स्पर्धकांना झाडे मिळतील. २६ जुलै २०२४ या कालावधीत स्पर्धेत सहभागी होऊन झाडांची लागवड करावी लागणार आहे. लागवड केलेल्या झाडांचा फोटो ९८५०२०९१७८ या व्हॉटस् अॅपवर मोबाईल क्रमांकावर दर तीन महिन्यानंतर पाठवावा लागणार आहे. वर्षभर स्पर्धकांना झाडांचे संवर्धन करावे लागणार आहे. ५ जून २०२५ रोजी स्पर्धेचा निकाल जाहिर होईल. स्पर्धेत सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी (Manaswini Woman) या खुल्या स्पर्धेत सहभाग नोदवावा, , असे आवाहन मनस्विनी संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे.
मनस्विनीच्या या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या महिलांसाठी असलेल्या खुल्या स्पर्धेस २३ जूनपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून २५ जुलै पर्यंत स्पर्धेत सहभाग घेण्याची महिलांना संधी आहे. महिलांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन दैनिक देशोन्नती मनस्विनी संयोजिका मनिषा गोरे यांच्या वतीने करण्यात आले.
नाव नोंदणी नि:शुल्क
स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी साडी व इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मोफत झाडे दिली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या (Manaswini Group) महिलांनी किमान ३ किंवा त्यापेक्षा अधिक ५ झाडे लावणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, मात्र नावनोंदणी आवश्यक आहे. २६ जुलै पर्यंत नावनोंदणी करावी लागणार आहे. (Online registration) नोंदणी ऑनलाईन सुध्दा करता येणार आहे.