सखी वन स्टॉप सेंटर येथे महिलांसाठी मार्गदर्शन!
परभणी (Manaswini) : मनस्विनी ग्रुप व सखी वन स्टॉपच्या वतीने महिलांच्या संरक्षणासाठी मनस्विनींची एक भेट सखी वन स्टॉप सेंटरल, वृक्षारोपन व उत्स्फुर्त भाषण स्पर्धेचे आयोजन रविवार 13 जुलै रोजी करण्यात आले आहे. मनस्विनी ग्रुपच्या उत्स्फुर्त भाषण स्पर्धेचे (Speech Competition) आयोजन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, पहिला मजला, पोलीस मुख्यालयासमोर, शनि मंदिरच्या बाजूला परभणी येथे रविवार 13 जुलै रोजी करण्यात आले आहे.
श्री साई बेंटेक्स ज्वेलरी कडून मिळणार पारितोषीक!
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता वृक्षारोपणे होणार असून त्यानंतर महिलांना मार्गदर्शन (Mentoring Women) मिळणार आहे. सखी वन स्टॉप सेंटर, परभणी हे हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी वैद्यकीय, कायदेशीर, मानसशास्त्रीय समुपदेशन व तात्पुरत्ता निवारा पुरवणारे केंद्र असून सर्व मनस्विनी महिला मार्गदर्शन घेवून सक्षम मनस्विनी इतर महिलांच्या संरक्षणासाठी सज्ज होणार आहेत. या ठिकाणी उत्स्फूर्त भाषण स्पर्धा देखील होणार आहे. या उस्फूर्त भाषण स्पर्धेचे पारितोषिक श्री साई बेंटेक्स ज्वेलरी व वन ग्राम गोल्ड ज्वेलरी यांच्यातर्पेâ मिळणार आहेत. सर्व मनस्विनी महिला सदस्यांनी व इतर महिलांनी देखील या भाषण स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन दैनिक देशोन्नतीच्या मनस्विनी संयोजिका मनिषा गोरे यांनी केले आहे. या कार्यक्रमा विषयी अधिक माहितीसाठी मनिषा गोरे – मनस्विनी संयोजिका दै.देशोन्नती परभणी मो.नं. ९८५०२०९१७८ व तेजस्विनी कांबळे केंद्र प्रशासक सखी वन स्टॉप सेंटर, परभणी. मो.नं. ९६७३८४३३५८ या क्रमांकावर महिलांनी संपर्क साधावा.
