लाखोचा माल पळविला
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Mandir Peti theft) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी यांच्या आशीर्वादाने गावात ठिक ठिकाणी अवैध दारू सुरु आहे त्यामुळे गावात चोऱ्याचे प्रमाण अधिकच वाढतच चालल्याने रात्रीला अद्यात चोरट्यानी एकाच रात्री तीन मंदिरातील दान पेट्या फोडून लाखोचा माल चोरून नेला. ही (Mandir Peti theft) घटना चार नोव्हेबर रोजी सकाळी उघडकीस आली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु येथे भव्यदिव्य असलेले हनुमान मंदिर, महादेव मंदिर,संतोषी मातेचे मंदिर असे तीन मंदिरे आहेत. या मंदिरापैकी एक हनुमान मंदिरावर पूजारी म्हणून दगडूजी वाळेकर हे गेल्या 10 वर्षा पासून पूजा पाठ करतात. मंदिरा मध्ये एक दान पेेटी ठेवलेली होती. दरवर्षी या दान पेटीत 20 ते 30 हजार रुपये भाविक भक्त दान करतात. मात्र 3 नोव्हेबर रोजी रात्रीला कोणत्यातरी चोरट्याने मंदिराचा दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि मंदिरातील दान पेटी फोडून त्यातील हजारो रुपये लंपास केले. 4 नोव्हेबर रोजी सकाळी पूजारी हे पूजा करण्यासाठी मंदिराजवळ गेले असता (Mandir Peti theft) मंदिराचा दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले.
तसेच दान पेटीचे सुध्दा कुलूप फोडलेले दिसलें त्याचं बरोबर महादेव मंदिर,संतोषी मातेचे मंदिर अशा तीन मंदिरातील दान पेट्या फोडून लाखो रुपयाचा ऐवजी लंपास केला या घटनेची माहिती पुजारी यांनी मंदिरा समोर राहणारे रमेश पडघान यांना दिली असता त्यांनी लगेच हा प्रकार पाहून मंदिर संस्थेचे संचालक मंडळ बोलून घेतले आणि या घटनेची तक्रार विजू पाटील, राजेंद्र पाटील, भास्कर पाटील, यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली.
ठाणेदार विकास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा केला. यावेळी गावकरी चर्चा करीत होते की गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने ठिक ठिकाणी अवैध देशी दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे (Mandir Peti theft) चोऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अवैध दारू विक्रेते म्हणतात की आम्ही दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना हप्ते देतो त्यामुळे आम्ही व्यवसाय करतो. अशा या प्रकारला आळा घालण्यासाठी ठाणेदार विकास पाटील यांनी दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना ताकीत देवून गावातील अवैध दारू बंद करावी आणि या चोरट्यांना लवकरच अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.