शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य: मुंबई येथे सन्मान सोहळा उत्साहात साजरा
अमरावती (Sharad Pawar Inspire Fellowship’) : शैक्षणिक क्षेत्रात ” द स्टुडंट्स मार्ट ” उद्योजकतेचे पहिले पाऊल हा अभिनव उपक्रम अमरावतीच्या जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळा येथे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मंगेश मानकर (Mangesh Mankar) यांना ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५’ प्रदान करण्यात आली. ८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित (Inspire Fellowship) भव्य फेलोशिप सोहळ्यात त्यांना हा सन्मान देण्यात आला.
हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने सुप्रिया सुळे (संस्थापक, SPIF), डॉ. अनिल काकोडकर (अध्यक्ष, SPIF) आणि श्री. विवेक सावंत (मुख्य समन्वयक व मार्गदर्शक, SPIF) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला शिक्षण, साहित्य आणि शेती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंगेश मानकर यांनी शालेय स्तरावर ‘द स्टुडंट्स मार्ट’ या अभिनव उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नेतृत्वगुण, आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास घडवून आणला आहे. या (Inspire Fellowship) उपक्रमामुळे शेकडो विद्यार्थ्यांना स्वावलंबन व व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाले असून, त्यांचा शैक्षणिक व वैयक्तिक विकास साध्य झाला.
पुरस्कार स्वीकारताना मंगेश मानकर (Mangesh Mankar) यांनी कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, “हा सन्मान माझ्या कार्यावरील विश्वास व जबाबदारी वाढवतो. ‘द स्टुडंट्स मार्ट’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलताना पाहून मला समाधान वाटते. भविष्यात आणखी नवे शैक्षणिक प्रकल्प राबवण्याची प्रेरणा या (Inspire Fellowship) फेलोशिपमुळे मिळेल.” या सोहळ्यात मानकर यांच्या कार्याची स्तुती करत मान्यवरांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.