पाथरी (Heavy rain) : परभणी/पाथरी तालुक्यातील उत्तर भागातील गाव शिवारात सोमवारी सायंकाळी (stormy winds) वादळीवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने बागायती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्याचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पाथरी तालुक्यातील खेडूळा, बोरगव्हाण, देवनांद्रा, झरी, देवेगाव, सिमूरगव्हाण आदी गावांमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्याचा तडाखा बसला आहे. यात झरी तलावाशेजारी असणाऱ्या गावातील केळी उत्पादक (farmer financial loss) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याने केळी, आंबा पिकांचे नुकसान
सायंकाळी साडेपाच वा. सुमारास अचानक उठलेल्या (stormy winds) वादळाने धुळीचे मोठे लोट उडाले होते. ग्रामीण भागासह शहरातही सुमारे अर्धा तास वादळी वारे झाले. काही गाव शिवारामध्ये विजांच्या कडकडाटासह यावेळी पाऊसही पडला. बोरगव्हाण, झरी व देवनांद्रा गाव शिवारामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टांने जोपासलेल्या केळीच्या बागा यावेळी आडव्या झाल्या.
अवकाळी पाऊस व वादळीवार्याचा बसला तडाखा
बोरगाव शिवारांमधील लक्ष्मीबाई बाबुराव गुंडे या महिला शेतकऱ्याचे दिड एकर वरील केळी बाग यावेळी भुईसपाट झाली. अपरिपक्व केळीचे घड असलेली ही बाग आडवी झाल्याने सदरील महिला (farmer financial loss) शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरातील इतरही शेतकऱ्यांना या (stormy winds) वादळ वाऱ्याचा फटका बसला असून, केळी सह आंबा पिकाचेही मोठे नुकसान यावेळी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान झालेल्या वादळ वाऱ्यामुळे ग्रामीण भागासह शहरातील वीज गुल झाली होती. शहरांमध्ये रात्री उशिरा (Power supply) वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. परंतु ग्रामीण भागात विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.