मंगरूळपीर/ वाशिम (Mangrulpir Crime) : शेतातील आंब्याचे कडघर का फेकले, असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या कमरेवर व उजव्या हातावर (Mangrulpir Crime) कुऱ्हाड मारल्याची घटना 10 जुलै रोजी पिंपरी बु. येथे घडली. याप्रकरणी (Mangrulpir police) पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी बबन वामनराव ठाकरे वय ७० वर्ष रा. पिंपरी बु. यांच्या फिर्यादीनुसार 10 जुलै रोजी 7:45 वाजता फिर्यादी घरी हजर असताना घराशेजारी राहणारा तुळशीराम वामन ठाकरे हा घरी आला . त्यावेळी त्याने माझ्या शेतातील आंब्याचे कडघर तुम्ही का फेकले, अशी विचारणा केली. यावर फिर्यादीने कडघर फेकली नसल्याचे म्हणताच आरोपीने फिर्यादीच्या कमरेवर व उजव्या हातावर कुऱ्हाड मारून जखमी केले. तर शंकर तुळशीराम ठाकरे व अन्य एक जण यांनी शिवीगाळ केली, अशा तक्रारीवरून (Mangrulpir police) मंगरूळपीर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.