५९८००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मंगरूळपीर (Mangrulpir police) : येथील खुल्या जागेत सवासनी रोड चेलपुरा या भागात कत्तलीसाठी जाणारे जनावरे बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती (Mangrulpir police) पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळाली असता त्यांनी दिनांक ७ ऑगस्ट च्या रात्री 11 ते 3 च्या दरम्यान तीन पथके नेमून 89 जनावरांची सुटका केली आहे
पोलीस (Mangrulpir police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सवासनी रोड चेहलपुरा भागातील इरफान मोहंमद , मोहमद सलीम यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत मोठ्या संख्येने गोवंश चिखलात बांधून च ठेवण्यात आले, यामध्ये गाई ,गोरे,कालवड,बैल,असे एकूण ८९ गोवंश आढळून आले,याबाबत कोणीही मालकी हक्क दाखवला नसल्याने ही सर्व जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी ८९ गोवंशाची सुटका करून पाच लाख 98 हजार मुद्देमाल जप्त केला. स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व गोवंश पालन पोषण करणारी केशव गौरक्षण संस्था मोहगव्हाण येथे खाजगी वाहनाने सुखरूप पोहोचविण्यात आले, सदर प्रकरणांमध्ये पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड यांच्या फिर्यादीवरून (Mangrulpir Crime) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि शुभांगी थोरात करीत आहे.
सदर कारवाई ही (Mangrulpir police) पोलीस अधीक्षक अनुप तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलिमा आरज, यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुधाकर आडे, सपोनी शुभांगी थोरात, पो.उ.प. नि. दिनकर राठोड, संजय घाटोळे, अनिल दहातोंडे, पोलीस कॉन्स्टेबल. जितेंद्र ठाकरे, शकील मुन्नी वाले, समिरखान, गजानन मेंढे, वैभव येळणे, गजानन ब्राह्मण, अमोल वारकड, पोलीस कॉन्स्टेबल राम राऊत, इस्माईल खाली वाले, नागोराव राठोड, उमेश ठाकरे, यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पूर्ण केली