मंगरुळपीर (Mangrulpir Police) : लोकांना फसविण्याच्या उद्देशाने भारतीय चलनी नोटा बनविण्याचे साहित्य जवळ बाळगणाऱ्या टोळीवर (Mangrulpir Police) मंगरूळपीर पोलिसांनी कारवाई करून 1 लाख 78 हजार 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शनिवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी घडली आहे.
मंगरूळपीर पोलिसांची धाडसी कारवाई, आरोपींना अटक
पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितनुसार दि.8 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजताचे दरम्यान पोलीस स्टेशन ला गोपनीय माहिती मिळाली की एक कथिया रंगाची इंडिगो कंपनीची कार क्रमांक एम. एच .30 एएफ १०८२ मध्ये तीन इसम नकली चलनी नोटा बनविण्याकरता लागणारे साहित्य नांदेड वरून घेऊन येत आहे अशा माहितीवरून रात्री अकरा वाजता चे सुमारा कारवाई पथक नाकाबंदी करीत असताना वाशिम कडून एक कथिया रंगाची इंडिगो कंपनीची कार क्रमांक एम एच 30 ए एफ १०८२ ही येताना दिसल्याने कारवाई पथकांनी सदर वाहना थांबवण्याचा इशारा केला असता ती न थांबता कारंजा रोडणे पळून जात असताना सदर वाहनाचा पाठलाग करून पकडले आणि सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये तीन इसम मिळून आले त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे शिवाजी साहेबराव खराडे वय 53 राहणार शिवाजीनगर कारंजा, शेख जावेद शेख लालन वय 44 राहणार मज्जिद पुरा कारंजा, शेर खान मेहबूब खान वय 46 वर्ष राहणार मोती मस्जिद काझीपुरा कारंजा असे सांगितले सदर इसमाची झडती घेतला असता त्यांचे जवळ एक भुरकट रंगाची बॅग मिळून आली. सदर बॅगमध्ये काळ्या रंगाचे चलनी नोटाचे आकाराचे कापलेले कागदाचे 16 बंडल मिळून आले.
तसेच सदर वाहनांमध्ये एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक कॅन ज्यामध्ये अंदाजे दोन लिटर कोणत्यातरी द्रव्याने भरलेले मिळून आले. सदर चलनी नोटाचे आकाराचे कागदाचे बंडल आणि द्रव्याबाबत नमूद इसमांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडवी चे उत्तरे दिली वरून त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली असता नमूद ईसम यांनी सांगितले की नमुद चलनी नोटांचे आकाराचे काळ्या रंगाचे बंडल हे नमूद द्रव्याच्या सहाय्याने नकली पाचशे रुपयांच्या नोटा तयार करण्यासाठी त्यांनी मोबाईल क्रमांक 83 900 238 48 धारक धारक नामे हाजी साब रा. नांदेड नावाच्या इसमांकडून नगदी एक लाख रुपये देऊन घेऊन आल्याचे सांगितले . वरून तिन्ही इसम यांनी नकली भारतीय चलनी नोटा तयार करायचे साहित्य ईतरांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हाजी साब रा. नांदेड नावाचे इसमा सोबत संगणमत करून त्यांचेकडून नकली नोटा बनविण्याकरता उपयोगात येणारे साहित्य आणि नगदी रुपये तसेच मोबाईल आणि वाहन अशा मुद्देमाला सह ताब्यात घेऊन नमूद तीन इसम आणि मोबाईल क्रमांक 83 900 238 48 धारक हाजी साब नांदेड यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे दि.9/8 /2024 रोजी गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यात दि.9 /8/2024 रोजी नमुद तीन्ही आरोपी यांना अटक करण्यात आली असून यातील चौथा आरोपी नसरुल्ला खान अजित खान उर्फ हाजी साब राहणार नांदेड यास दिनांक 10 /8 /2024 रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपीताकडून एकूण 1 लाख 78 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास (Mangrulpir Police) पोलीस उपनिरीक्षक धावळे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती नीलिमा आरज पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे पोलीस उपनिरीक्षक दिनकर राठोड व राम ढगे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय घाटोळे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे व माळकर आणि रफिक व येळणे चालक उमेश ठाकरे यांनी पार पाडली आहे.