औसा/ लातूर (Manjra river) : मांजरा नदीतून (Manjra river) वाहून जाणारे पाणी तावरजा मध्यम प्रकल्पात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे सदरील प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश (दि.२१) जूनच्या बैठकीत जलसंपदा विभागाचे (Water Department) अप्पर मुख्य सचिव दिपक कुमार यांना दिल्याची माहिती आ. पवार यांनी दिली.
आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
औसा विधानसभा मतदारसंघातील तावरजा मध्यम प्रकल्पाचे काम जून १९८१ मध्ये पूर्ण झाले. प्रकल्पीय संकल्पित पाणीसाठा २७.७२७ दलघमी असून, प्रकल्प आतापर्यंत १०० टक्के क्षमतेने ३ वेळा, ९० टक्केपेक्षा जास्त ६ वेळा, ५० टक्केपेक्षा जास्त ११ वेळा, ५० टक्केपेक्षा कमी २० वेळा भरलेला आहे. या (Manjra river) प्रकल्पातून अनेक पाणीपुरवठा योजना तसेच साखर कारखाने व सिंचन क्षेत्र अवलंबून आहेत.प्रकल्पात वर्षनिहाय झालेल्या पाणीसाठ्याच्या अभ्यास केला असता प्रकल्प पूर्ण झाल्यापासून ४० वर्षात पाणीसाठ्याची वार्षिक सरासरी ५० टक्के इतकी आहे. म्हणजेच प्रकल्पीय पाणीसाठ्यात ५० टक्के इतकी तूट आहे. तावरजा प्रकल्पात दरवर्षी अत्यल्प पाणीसाठा जमा होतो. १९८१ पासून हा प्रकल्प ३ वेळाच शंभर टक्के भरलेला आहे. सदरील प्रकल्प सरासरी ५० टक्के पेक्षा कमी भरत असल्याने ऐन उन्हाळ्यात हा प्रकल्प कोरडाठक पडतो.
या प्रकल्पातून अनेक पाणीपुरवठा योजना (Water Department) तसेच साखर कारखाने व सिंचन क्षेत्र अवलंबून आहेत. तावरजा नदी प्रकल्पात ही तूट भरुन काढाण्यासाठी आणि लातूर तालुक्यातील पश्चिम भागातील आणि औसा तालुक्यातील पूर्व भागातील पाणीसंकट कायमचे दूर करण्यासाठी मांजरा नदीवरील (Karsa-Pohregaon) कारसा-पोहरेगाव बंधाऱ्यातून वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून वळण योजना अत्यंत महत्वाची ठरणार असून, या भागाचा कायापालट होऊन हरितक्रांती निर्माण होईल. मांजरा नदीवर कारसा -पोहरेगाव येथे बॅरेज बांधण्यात आला असून या बॅरेजमधून मांजरा नदीच्या पुराचे व मांजरा धरणातून सोडलेले पाणी कर्नाटक राज्यात वाहून जाते. या पाण्याचा सीमावर्ती भागातील प्रकल्पांना फायदा होत नाही. कारसा- पोहरेगाव ते तावरजा मध्यम प्रकल्पामधील अंतर २२ किमी असून स्थिरशिर्ष ३५ मी.आहे. यासाठी ऊर्णामी नलिका लांबी १२ किमी असून गुरुत्वीय नलिका लांबी १० किमी आहे.
कारसा- पोहरेगाव (Karsa-Pohregaon) बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणारी जलनिष्पत्ती तावरजा प्रकल्पासाठी वळण योजना राबवून तावरजा प्रकल्पस्थळी मंजूर असूनही वापरात येत नसलेली पाणी वापराची सरासरी १४.० दलघमी तूट भरुन काढता येईल आणि त्यातून प्रकल्पाच्या लाभदारकाना सिंचनाचा लाभ होईल. या आ. अभिमन्यू पवार यांनी जलसंपदा विभागाकडे मागणी केली असून, (Karsa-Pohregaon) कारसा -पोहरेगाव बॅरेज येथून तावरजा मध्यम प्रकल्पासाठी वळण योजनेचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितास दिल्याचेही आ. पवार यांनी म्हटले आहे.